‘त्यांचा घटस्फोट…’, मामा गोविंदाच्या डिव्होर्सवर कृष्णा अभिषेकने दिली प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. इतकच काय तर गोविंदाचे ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्यामुळे घटस्फोट होत आहे असे देखील म्हटले जात आहे. आता या चर्चांवर गोविंदाचा भाचा, अभिनेता कृष्णा अभिषेकने प्रतिक्रिया दिली आहे. कृष्णा अभिषेक नेमकं काय म्हणाला चला जाणून घेऊया…
काय म्हणाला कृष्णा अभिषेक?
सध्या सगळीकडे गोविंदाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. अभिनेता आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकने या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे. कृष्णा अभिषेकने नुकताच एचटी सीटीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला मामा गोविंदाच्या खासगी आयुष्याविषयी विचारण्यात आले. गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाविषयी बोलताना कृष्णा अभिषेक म्हणाला की, ‘हे शक्यच नाही. त्यांचा घटस्फोट होणार नाही.’
मॅनेजरने देखील दिली प्रतिक्रिया
सुनीताने गोविंदाला काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची नोटीस पाठवली असल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यावर गोविंदाने कोणतेही उत्तर दिले नसल्याचे म्हटले आहे. जवळच्या सूत्रांनी ईटाइम्सला माहिती दिली की, घटस्फोटाची नोटीस पाठवण्यात आली आहे. पण त्यावर कोणतीही अॅक्शन घेण्यात आलेली नाही. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शशी यांनी एबीपी न्यूजशी बोलताना म्हटले की, ‘या रिपोर्ट्समध्ये कोणतेही तथ्य नाही. मी गोविंदासोबत कायम असतो आणि हे असे अजिबात नाही. सुनीताने काही मुलाखती दिल्या आहेत आणि काहींनी ती बोललेल्या शब्दांसोबत खेळ केला आहे. त्यामुळेच अशा बातम्या पसरवल्या जात आहेत.’
सुनीता आणि गोविंदा राहतात वेगळे
सुनीताने हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ती गोविंदासोबत राहत नाही. सुनीताने सांगितले होते की ते बऱ्याच वेळा वेगळे राहतात. सुनीता एका फ्लॅटमध्ये मुलांसह राहते. तर गोविंदा फ्लॅटसमोरील बंगल्यात राहतो. याशिवाय सुनीता म्हणाली होती की, ‘कोणत्याही माणसावर कधीही विश्वास ठेवू नका. लोक सरड्यासारखे रंग बदलतात. आमच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. तो कुठे जाईल? पूर्वी मी कुठेही जात नसे आणि आता मला माहित नाही…’ सुनीता पुढे म्हणाली होती की मी पूर्वी खूप सुरक्षित होते. पण मी आता नाही. वयाची ६० वर्षे ओलांडल्यानंतर लोक विचित्र वागायला लागतात. गोविंदाची ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. तो काय करतोय कुणास ठाऊक. मी गोविंदाला सांगितले की तू ६० वर्षांचा झाला आहेस, हट्टी होऊ नकोस.’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List