‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये अखेर तो क्षण आलाच; प्रेक्षकांमध्ये प्रपोजलची प्रचंड उत्सुकता
'झी मराठी' वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेच्या कथानकात रंजक वळण आलं आहे. एजेनं प्रपोज करावं म्हणून लीला उपोषणाला बसणार आहे. त्यात तिला सरोजिनीची साथ मिळणार आहे.
लीलाचं उपोषण मोडण्यासाठी एजे तिच्या आवडीचा नाष्टासुद्धा बनवतोय. पण काही केल्या लीला उपोषण सोडत नाही. सुनासुद्धा लीलावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
शेवटी एजे स्वतः सुद्धा उपाशी राहण्याचा निश्चय करतो, तेव्हा मात्र लीलाचा नाईलाज होतो. पण ती आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. मला प्रपोज करावंच लागेल, असं ती एजेला म्हणते.
जी गोष्ट अंतरासोबत झाली ती लीलासोबत होऊ नये, अशी भीती एजेच्या मनात आहे. म्हणून तो अंतराच्या फोटोजवळ जाऊन त्याच्या मनातली भीती बोलून दाखवतो. जेव्हा जेव्हा त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं तेव्हा ती व्यक्ती त्याच्यापासून दुरावली गेली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List