रणवीर अलाहाबादिया, समय रैना, एल्विश यादव.. युट्यूबर्स दर महिन्याला किती कमावतात?; आकडा वाचून व्हाल थक्क!
सध्या युट्यूबर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचा जमाना आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यांची लोकप्रियता सेलिब्रिटींइतकीच आहे. किंबहुना काहीजण सेलिब्रिटींपेक्षाही अधिक लोकप्रिय आहेत. सध्या रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना हे युट्यूबर्स एका वादग्रस्त शोमुळे चर्चेत आले आहेत. रणवीरने या शोमध्ये एका स्पर्धकाला आई-वडिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह सवाल केला होता. त्यानंतर त्याच्यावर कारवाईची मागणी होतेय. या वादामुळे पुन्हा एकदा युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स चर्चेत आले आहेत. सोशल मीडियाद्वारे त्यांची लाखोंची कमाई होते. टॉप ५ युट्यूबर्स दर महिन्याला किती कमावतात, ते पाहुयात..
समय रैना- ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोचा कर्ताधर्ता समय रैना त्याच्या कंटेंटच्या माध्यमातून दर महिन्याला जवळपास दीड कोटी रुपयांची कमाई करतो. समयची कमाई ही इतर युट्यूबर्सच्या तुलनेत जास्त आहे, कारण तो त्याच्या शोचे व्हिडीओ फक्त पेड ऑडियन्सलाच (पैसे भरणाऱ्या प्रेक्षकांना) दाखवतो. सध्याच्या घडीला पाच ते सहा लाख लोक महिन्याला 59 रुपयांचं सबस्क्रिप्शन विकत घेऊन समयचं कंटेट पाहत आहेत. याच कारणामुळे या शोद्वारे त्याची कोट्यवधी रुपयांमध्ये कमाई होत आहे. याशिवाय सोशल मीडियाद्वारे त्याला जवळपास 50 लाख रुपये मिळतात. अशा पद्धतीने समयची एका महिन्याची कमाई ही जवळपास दोन कोटींच्या घरात आहे.
रणवीर अलाहाबादिया- ‘बीअर बायसेप्स’ नावाने सोशल मीडिया पेज असलेला युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याचे जवळपास सात युट्यूब चॅनल आहेत. या चॅनल्सद्वारे तो जवळपास 35 कोटी रुपयांची कमाई करतो. याशिवाय रणवीरचा इतर व्यवसायसुद्धा आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. रणवीरची दर महिन्याची कमाई 50 लाख रुपयांपर्यंत आहे.
आशिष चंचलानी- इन्फ्लुएन्सर स्पेस वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, आशिष चंचलानी त्याच्या युट्यूब चॅनद्वारे दर महिन्याला जवळपास 30 कोटी रुपये कमावतो. याशिवाय अभिनयाचे प्रोजेक्ट्स, ब्रँड कोलॅबरेशन, सोशल मीडिया अकाऊंटवरून होणारी कमाई यातून महिन्याला ही रक्कम 70 ते 80 लाखांपर्यंत पोहोचते.
एल्विश यादव- बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता आणि प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवचे दोन युट्यूब चॅनल आहेत. आपल्या एका युट्यूब व्हिडीओतून तो जवळपास 4 ते 6 लाख रुपये कमावतो. याशिवाय ‘लाफ्टर शेफ 2’ या शोमधून एल्विशला दर आठवड्याला 1.2 लाख रुपयांची फी मिळत आहे. युट्यूब आणि टीव्हीसोबतच एल्विश त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ब्रँड कोलॅबरेशनसुद्धा करतो. म्हणजेच सर्वकाही मिळून एल्विशची दर महिन्याची कमाई 40 लाख रुपयांच्या घरात आहे.
कॅरी मिनाटी (अजय नागर)- इन्फ्लुएन्सर स्पेस या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार कॅरी मिनाटी हा दर महिन्याला 16 लाख रुपये कमावततो. याशिवाय ब्रँडिंग आणि इन्स्टाग्रामवरील कंटेटद्वारे त्याची जवळपास 25 लाख रुपयांची कमाई होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List