‘छावा’ सिनेमामुळे निर्मात्यांना झालेल्या फायद्याचा आकडा ऐकलात का? ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांना देखील टाकले मागे
यंदाच्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ‘छावा’ रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट रोज काही ना काही विक्रम करत आहे. विकी कौशलच्या चित्रपटाने 2025 सालातील सर्वात मोठ्या ओपनिंग चित्रपटाचा किताबही पटकावला आहे. चित्रपटाला प्रदर्शित हऊन ११ दिवस झाले आहेत. पण चित्रपटाने तुफान कमाई केली आहे. चला जाणून घेऊया ‘छावा’ चित्रपटाच्या निर्मात्यांना किती नफा झाला आहे.
छावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या दहा दिवसात ३३४.५१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दररोज चित्रपटाच्या कमाईत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर तुफान चालणाऱ्या या चित्रपटाने निर्मात्यांना किती कोटी रुपयांचा नफा करून दिला हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
छावा चित्रपटाच्या बजेटविषयी बोलायचे झाले तर १३० कोटी रुपयांमध्ये सिनेमा तयार झाला आहे. तसेच चित्रपटाची दहा दिवसांची कमाई पाहायची झाली तर ती ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. सिनेमा लवकरच ४०० कोटी रुपयांचा आकडा पार करणार आहे. या चित्रपटाने बजेटपेक्षा अडीचपट जास्त कमाई केली आहे. जर आपण त्याची टक्केवारीत गणना केली तर ती २७० टक्क्यांहून अधिक झाली आहे. त्यामुळे छावा चित्रपटामुळे निर्मात्यांना चांगलाच नफा झाल्याचे स्पष्ट होत आहे.
छावा सिनेमाने पुष्पा २ सिनेमालाही टाकले मागे
हा एक विक्रम आहे. कारण पुष्पा 2 सिनेमाच्या कमाईतून देखील निर्मात्यांना इतका नफा झाला नव्हता. पुष्पा 2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शन १२३४.१ कोटी रुपये झाले होते. तसेच चित्रपटाचे बजेट हे ५०० कोटी रुपये होते. त्यानुसार पुष्पा सिनेमाने बजेटच्या केवळ २४६ टक्के जास्त कमाई केली होती. तर छावाने अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला मागे टाकत केवळ ११ दिवसांत २७० टक्के अधिक कमाई केली आहे.
छावा सिनेमाविषयी
छावाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने साकारली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसत आहे. तर अक्षय खन्ना यांच्यासह आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंग यांनी देखील सिनेमात उत्कृष्ट काम केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List