‘उतेकरांनी शहाणपणा शिकवायचा नाही…’; संभाजी ब्रिगेडचा इशारा; ‘छावा’मधील ‘तो’ सीन काढून टाकण्याची मागणी
‘छावा’ चित्रपटाची लोकांमधली क्रेझ सर्वांनाच माहित आहे. चित्रपटातील कथेच आणि कलाकारांचं प्रचंड कौतुक होतानाही दिसत आहे. चित्रपटाने थिएटरमध्ये हाऊसफूलचे बोर्ड लावून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मात्र चित्रपट रिलीजनंतर छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी मुघलांना मदत केली,त्यांनी स्वराज्याशी गद्दारी केल्याचं सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
यावर आता शिर्के घराण्यातील वंशजांकडून आक्षेप घेतला जात आहे. याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी त्यांची माफी मागून त्यांचा असा कोणाताही हेतू नव्हता. तसेच चित्रपटाची कथा ही पुस्तकावरून घेतल्याचं सांगत काही मुद्देही स्पष्ट केले आहेत.मात्र आता हा वाद वाढतच चालल्याचं दिसत आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड मैदानात
मात्र आता छावा चित्रपटाच्या दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या विरोधात शिर्के घराण्याने पुकारलेल्या बंडला संभाजी ब्रिगेडनेही पाठिंबा दर्शवला आहे. पानशेत धरण परिसरातील शिरकोली गावात कुलदैवत शिरकाई देवी मंदिरात शिर्के घराण्यातील सर्व कुटुंबीयांनी एकत्र येत बैठक घेतली होती. या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रवक्त्यांनीही हजेरी लावत पाठिंबा दिला आहे.
लक्ष्मण उतेकरांविरोधात न्यायालयात जाणार असून संभाजी ब्रिगेड स्टाईलने त्यांना धडा शिकवावा लागेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी इशारा दिला आहे. संतोष शिंदे यांनी ‘टिव्ही 9’ सोबत संवाद साधला असता त्यांनी लक्ष्मण उतेकरांवर संताप व्यक्त केला आहे.
“दिग्दर्शकाला कायं साध्य करायचं?…”
लक्ष्मण उतेकरांनी चित्रपटातील सीनवर आक्षेप घेत म्हटलं आहे,” शिर्के यांना चित्रपटामध्ये गद्दार ठरवून दिग्दर्शकाला कायं साध्य करायचं आहे? यामध्ये कुठेतरी बामणी कावा दिसतोय. एका बाजूला संभाजी महाराज अत्यंत ग्रेट दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे मेव्हणे गद्दार दाखवायचे, हा प्रकार आम्हाला मान्य नाही, संभाजी ब्रिगेड अजिबात खपवून घेणार नाही..आता लढा रस्त्यावरचा सुरू होईल..चित्रपटातून वादग्रस्त प्रसंग वगळला नाही तर संभाजी ब्रिगेड धडा शिकवे” अशी थेट भूमिका शिंदेंनी घेतली आहे.
“उतेकरांनी चित्रपटातून वादग्रस्त भाग वगळला नाही तर…”
तसेच ते पुढे म्हणाले ‘इतिहास घडवला मावळ्यांनी, लिहिला मनुवादी कावळ्यांनी, काही पात्रांची बदनामी करून तुम्हला कायं साध्य करायचं आहे. इतिहासचं पुर्णलेखन व्हायला पाहिजे. उतेकरांनी आम्हाला शहाणपणा शिकवायचा नाही. छावा कादंबरी हा इतिहास नाही. कल्पनाविस्तारावर ही कादंबरी लिहिलेली आहे. उतेकरांनी पळवाट शोधू नये. जर उतेकरांनी चित्रपटातून वादग्रस्त भाग वगळला नाही तर आम्हाला उतेकरांना शोधावं लागेल.. आणि संभाजी ब्रिगेड स्टाईलने त्यांना धडा शिकवावा लागेल” अशी तंबीच संतोष शिंदे यांनी लक्ष्मण उतेकरांना दिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List