माप ओलांडताना ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिताचा खास उखाणा; सासरी नवरीचं दणक्यात स्वागत
‘कोकण हार्टेड गर्ल ‘ अंकिता वालावलकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. बिग बॉसमध्ये असल्यापासूनच तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती. अंकिताने संगीतकार कुणाल भगतशी लग्नगाठ बांधली आहे. मेहंदी ते संगीत, हळद, लग्न, रिसेप्शनपर्यंत सर्व समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.
16 फेब्रुवारीला कोकणातील देवबाग येथे अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. सध्या तिच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
सासरी गृहप्रवेश करतानाच्या व्हिडीओची चर्चा
लग्नसोहळ्यातील विधी, अंकिता ने केलेले सर्व लूक, साडी, दागिने तसेच कुणाल म्हणजेच नवरदेवाने केलेला लग्नासाठीचा लूक सर्वांचीच सोशल मीडियावर चर्चा होताना पाहायला मिळाली. आता लग्नानंतर अंकिता तिच्या सासरी म्हणजे माणगावच्या घरी पोहोचली आहे. सासरी अंकिताचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. अंकिताने तिच्या सासरी गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताच्या सासरच्या घराची संपूर्ण झलक पाहायला मिळतेय.
गृहप्रवेशाच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं
दरम्यान, अंकिताने शेअर केलेल्या तिच्या या गृहप्रवेशाच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंकिताच्या सासरच्या मंडळींनी लाडक्या सूनेच्या स्वागतासाठी खास जय्यत तयारी केली होती. नव्या सुनबाईंच्या गृहप्रवेशासाठी आकर्षक सजावट आणि फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. एवढंच नाही तर दोघांसाठी खास कपल केकही मागवण्यात आला होता.
गृहप्रवेशावेळी नवरा-नवरीने घेतलेले उखाणे चर्चेत
दरम्यान कोकणातील परंपरेनुसार अंकिताचा सासरी गृहप्रवेश करण्यात आला. गृहप्रवेशावेळी दोघांनी सुंदर उखाणे देखील घेतले. व्हिडीओमध्ये गृहप्रवेशावेळी अंकिता उखाणा घेत म्हणाली, “समुद्रकिनारी जुळल्या गाठी, कुणालचं नाव घेते साताजन्मासाठी…”. यानंतर कुणालने उखाणा घेत म्हटंल, “सरीवर सरी पावसाच्या सरी, अंकिताच माझी कोकणपरी” या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला त्यांनी अंकिताच्या अल्बमधील ‘लग्नसराई’ हे गाणं लावलं आलं आहे.
व्हिडीओवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्स
दोघांच्याही उखाण्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अंकिताने गृहप्रवेशावेळी शेअर केलेल्या व्हिडीओला “माणगावच्या घरी गृहप्रवेश…” असं कॅप्शन दिलं आहे. अंकिताने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List