सर्वांत लोकप्रिय लव्ह-स्टोरी पुन्हा थिएटरमध्ये; 2 दिवसांत मोडला आपलाच जुना रेकॉर्ड
हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसैन यांच्या मुख्य भूमिका असलेला 'सनम तेरी कसम' हा चित्रपट नऊ वर्षांनंतर शुक्रवारी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे 2016 मध्ये बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. पण आता त्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळतोय.
या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत पहिल्यापेक्षा अधिक कमाई केली आहे. 2016 मध्ये 'सनम तेरी कसम' या चित्रपटाने 8 कोटी रुपये कमावले होते. आता दोन दिवसांतच कमाईचा हा आकडा पार झाला आहे.
शुक्रवारी, पुनर्प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 4.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी 5 कोटी रुपयांची कमाई झाली. दोन दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 9.50 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List