कपूर कुटुंबातील सर्वात श्रीमंत सून, तिच्याकडे अब्जांची संपत्ती, करीना – रणबीर तिच्यासमोर फेल
Kapoor Family: कपूर कुटुंब हे बॉलिवूडच्या प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कुटुंबापैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कपूर कुटुंब बॉलिवूडवर राज्य करत आहे. कपूर कुटुंबाला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. कपूर कुटुंबातील प्रत्येक पिढीने बॉलिवूडला स्टार दिले आहे. रणधीर कपूर, ऋषी कपूर यांच्यानंतर अभिनेत्री करिश्मा कपूर हिने बॉलिवूडवर राज्य केलं. आता अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता रणबीर कपूर बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.
पण कपूर कुटुंबाची सून जिच्या संपत्तीपुढे रणबीर आणि करीना देखील फेल आहेत. कपूर कुटुंबातील या सूनेकडे एकूण संपत्ती 550 कोटी रुपये म्हणजे 5.5 अब्ज रुपये आहे. असा दावा जीक्यूने आपल्या अहवालात केला आहे. ही सून दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री आलिया भट्ट आहे.
आलिया भट्ट हिने 2021 मध्ये अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. मुलीच्या जन्मानंतर देखील आलिया मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. रिपोर्टनुसार, आलिया एका सिनेमासाठी तब्बल 15 कोटी मानधन घेते.
कपूर कुटुंबतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीच दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री करीना कपूर आहे. करीना हिची नेटवर्थ 500 कोटी रुपये आहे. करीना हिने 2000 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. करीना एता सिनेमासाठी जवळपास 8 -10 कोटी रुपये मानधम घेते.
करीनाही ब्रँड्समधून कमाई करते. मात्र, 25 वर्षे बॉलिवूडमध्ये सक्रिय असूनही ती कमाईच्या बाबतीत आलियाच्या मागे आहे. तर आलिया केवळ 13 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आलिया फक्त सिनेमे नाही तर, अन्य मार्गांनी देखील कोट्यवधींची कमाई करते.
ब्रँड एंडोर्समेंटसाठी आलिया 9 कोटी रुपयांपर्यंत फी घेते. तिचा एक कपड्यांचा ब्रँड एड-ए-मम्मा देखील आहे… 2023 मध्ये, जेव्हा रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने ब्रँडमध्ये 51% हिस्सा विकत घेतला, तेव्हा ब्रँडचे मूल्य 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे नोंदवलं गेलं. आता या ब्रँडची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तिसऱ्या क्रमांकावर रणबीर कपूर आहे, अभिनेत्याची एकूण संपत्ती 345 कोटी रुपये आहे. एका सिनेमासाठी अभिनेता 70-75 कोटी रुपये घेतो आणि सिनेमाच्या नफ्यातही त्याचा वाटा असल्याच्या बातम्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List