सलमान खान तुरुंगात कसं आयुष्य जगायचा, किती तास झोपायचा? भाईजानकडून मोठा खुलासा
Salman Khan: अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेता फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाही तर, खासगी आयुष्या आणि अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे देखील चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना सलमान खान याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. एवढंच नाही तर, भाईजानला तुरुंगवास देखील भोगावा लागला आहे. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सलमान खान याने तुरुंगात घालवलेल्या दिवसांद्दल सांगितलं.
सलमान खान याने अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा मुलगा अरहान खान याच्या पॉडकास्ट शो ‘डम बिरयाणी’ मध्ये उपस्थित होता. अरहानच्या पॉडकास्टमध्ये सलमान खान याने आयुष्यातील अनेक रंजक गोष्टींचा खुलासा. पण तुरुंगात येणाऱ्या झोपेबद्दल आणि आताच्या आयुष्याबद्दल सलमान खान याने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र सलमान खान याच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
सलमान खान म्हणाला, ‘मझ्या झोपेचं वेळापत्रक फार वाईट आहे. घरात मी काही तासांसाठी झोपतो आणि महिन्यातून कधीतरी माझी 7 तासांची झोप होते. माझ्याकडे जेव्हा काहीच काम नसतं तेव्हा मी झोपतो… असं देखील अभिनेता म्हणाला.
‘मला तुरुंगात चांगली झोप लागायची… कारण तिकडे मला करण्यासाठी काहीही नव्हतं. तुरुंगात मला शांत झोप लागायची…’ असं देखील भाईजान म्हणाला.’ मुलाखतीत सलमान खान याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. शिवाय अरहान आणि त्याच्या मित्रांना यशाबद्दल सल्ला देखील दिला.
सलमान खान म्हणाला, ‘मैत्री आणि कुटुंबासाठी व्यक्तीला प्रचंड मेहनत करायला हवी. जेव्हा तुम्हाला यश मिळेल. त्या यशाचं श्रेय तुम्ही अशा लोकांना द्यायला हवं, ज्यांनी तुम्हाला संकटात साथ दिली होती.तुमच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी तुम्ही घेऊ शकता, पण यशाचे श्रेय कधीच एका व्यक्तीला मिळत नाही. यशाचं रुपांतर अहंकारात झालं तर तुमचे करिअर संपू देखील शकतं….’ असं देखील भाईजान म्हणाल.
सलमान खानचे सिनेमे
सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या आगामी ‘सिकंदर’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमात अभिनेत्यासोबत रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा पोस्टर देखील प्रदर्शित झाला आहे. आता चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List