महाकुंभमध्ये पोहोचली प्राजक्ता माळी; संगममध्ये मारली डुबकी, पहा Video

महाकुंभमध्ये पोहोचली प्राजक्ता माळी; संगममध्ये मारली डुबकी, पहा Video

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी स्नान केलंय. महाकुंभमध्ये यात्रेकरुंची संख्या दिवसागणिक वाढत असून दररोज लाखो भाविक संगममध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आणि अध्यात्मिक पुण्य प्राप्तीसाठी येत आहेत. कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा मानला जातो. कुंभमेळ्यात संगमावर स्नान केल्यास मृत्यूनंतर मोक्ष मिळतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्वसामान्यांपासून विविध सेलिब्रिटीसुद्धा महाकुंभमध्ये पवित्र स्नान करत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीसुद्धा कुंभमेळ्याला पोहोचली आहे.

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली. या व्हिडीओमध्ये प्राजक्ताने प्रयागराजची झलक दाखवली आहे. तिथली व्यवस्था, विविध आखाडे, साधूसंतांची भेट, देवदेवतांची पूजा आणि त्यानंतर संगममध्ये पवित्र स्नान.. हे सर्व प्राजक्ताच्या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय. आयुष्यात एकदाच येणारा अनुभव, असं लिहित तिने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

प्राजक्ता माळीची पोस्ट-

‘तीर्थराज – प्रयागराज #महाकुंभ #२०२५. लहानपणापासूनच कुंभमेळ्याविषयी मनात कुतूहल होतं. 144 वर्षांनी होणारा हा मेळा याची देही याची डोळा पहावा, अनुभवावा असं मनात आलं आणि पोहोचले. (काल सुखरूप महाराष्ट्रातही पोहोचले.) आयुष्यात एकदाच येणारा अनुभव’, अशी पोस्ट प्राजक्ताने लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. तर दर सहा वर्षांनी अर्धकुंभमेळा भरत असतो. मात्र आता प्रयागराजमध्ये होत असलेला महाकुंभ हा 144 वर्षांतून एकदा होणारा महाकुंभमेळा आहे. त्यामुळे त्याचं पावित्र्य अधिकच वाढलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनीसुद्धा महाकुंभमध्ये स्नान केलंय. मराठी कलाविश्वातील अभिनेता स्वप्निल जोशी, सौरभ चौगुले यांनीसुद्धा महाकुंभमध्ये पवित्र स्नान केलंय. केवळ भारतीयच नाही तर परदेशातूनही असंख्य भाविक याठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. जगप्रसिद्ध म्युझिक बँड ‘कोल्ड प्ले’चा मुख्य गायक ख्रिस्ट मार्टिनसुद्धा गर्लफ्रेंड डकोटा जॉन्सनसोबत महाकुंभमध्ये पोहोचला होता. यावेळी दोघांनी संगममध्ये पवित्र स्नान केलं.

महाकुंभमध्ये निरनिराळ्या पंथांचे 13 आखाडे सहभागी झाले आहेत. 45 दिवसांपर्यंत हा कुंभमेळा पार पडणार आहे. येत्या माघ पौर्णिमेला संगममध्ये शाही स्नान होतील.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेनेबाबत वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हे अडचणीत? ठाकरे गटाकडून अशी तयारी, आता थेट… शिवसेनेबाबत वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हे अडचणीत? ठाकरे गटाकडून अशी तयारी, आता थेट…
UDDHAV THACKERAY ON NEELAM GORHE: शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल विधान केले. ठाकरेंच्या शिवसेनेत...
माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही…खुर्चीत बसून संपवेन… रामराजे निंबाळकर यांचा कुणाला इशारा?
नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं; राऊतांचं थेट उषा तांबेंना पत्र, केली मोठी मागणी
राज्यातील सर्व आमदारांना छावा चित्रपट दाखणार, कोणी अन् कसे केले नियोजन
“भैया थोडा और तीखा बनाओ”; मोफत मिळालेल्या पाणीपुरीवर श्रद्धा कपूर तुटून पडली
Thane Crime News – शाळकरी मुलींचा सेल्फी काढण्याच्या बहाण्याने केला विनयभंग, आरोपीला अटक
तापमान 40 अंशांवर पोहचले; उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याचा अवकाळीचा इशारा