डार्क चॉकलेट ह्रदयरोग, मधुमेह, त्वचेसाठी फायदेशीर? जाणून घ्या

डार्क चॉकलेट ह्रदयरोग, मधुमेह, त्वचेसाठी फायदेशीर? जाणून घ्या

Dark Chocolate Benefits: चॉकलेट खायला कुणाला नाही आवडत. लहान मुलांसह मोठ्यांनाही चॉकलेट खायला आवडतं. पण, यात तुम्ही डॉर्क चॉकलेट खात असाल तर उत्तम आहे. कारण, याचा आरोग्याला मोठा फायदा होतो. आता डॉर्क चॉकलेटचे फायदे नेमके कोणते आहेत? याविषयी पुढे जाणून घेऊया.

चॉकलेट हा एक असा पदार्थ आहे जो लहान मुलांसह सर्व वयोगटातील लोकांना खूप आवडतो. मात्र बहुतांश लोकांना मिल्क चॉकलेट खायला आवडतं आणि चॉकलेट आता बाजारात अनेक फ्लेवर्समध्ये येऊ लागले आहेत.

सध्या डार्क चॉकलेट खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होऊ शकतात, कारण त्यात साखरेचे प्रमाण खूप कमी असते आणि ते कोको सॉलिडपासून बनलेले असते. निरोगी राहण्यासाठी डार्क चॉकलेटला आपल्या रुटीनमध्ये स्थान दिले पाहिजे. टेस्टनुसार तुम्हाला बाजारात थोडे कमी कडू चॉकलेट मिळेल, पण 90 टक्के कोको सॉलिड असलेले डार्क चॉकलेट सर्वोत्तम मानले जाते. डार्क चॉकलेट किती खावे आणि त्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया.

डार्क चॉकलेट आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु ते मर्यादित प्रमाणात खाणे देखील फायदेशीर आहे. निरोगी व्यक्तीसाठी रोज 30 ते 40 ग्रॅम डार्क चॉकलेटचे सेवन करणे पुरेसे आहे. आरोग्याच्या काही समस्यांमध्ये किंवा जे एखाद्या विशिष्ट आहार योजनेचे अनुसरण करतात त्यांनी प्रथम त्यांच्या आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जाणून घेऊया डार्क चॉकलेटचे फायदे.

डार्क चॉकलेटमुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो
डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाला फायदा होतो. रक्ताभिसरण योग्य ठेवणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे इत्यादींसाठी फायदेशीर ठरणारे अनेक पोषक घटक यात आढळतात. यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.

डार्क चॉकलेट मेंदूसाठी फायदेशीर
डार्क चॉकलेट तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे मूड वाढतो, त्यामुळे मेंदूसाठीही फायदेशीर आहे. रोज थोडे से डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुम्ही हृदयाबरोबरच मेंदूही निरोगी ठेवू शकता, पण त्यासाठी हेल्दी रूटीन असणं गरजेचं आहे.

डार्क चॉकलेटमुळे त्वचा निरोगी राहते
डार्क चॉकलेटचे सेवन देखील आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यास आणि घट्टपणा राखण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स त्वचेसाठी नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून फायदेशीर आहेत.

डार्क चॉकलेट मधुमेहात फायदेशीर
फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध असल्याने डार्क चॉकलेट मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेही लोकांनी प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि चरबी आणि साखर नसलेले डार्क चॉकलेट निवडावे.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेनेबाबत वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हे अडचणीत? ठाकरे गटाकडून अशी तयारी, आता थेट… शिवसेनेबाबत वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हे अडचणीत? ठाकरे गटाकडून अशी तयारी, आता थेट…
UDDHAV THACKERAY ON NEELAM GORHE: शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल विधान केले. ठाकरेंच्या शिवसेनेत...
माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही…खुर्चीत बसून संपवेन… रामराजे निंबाळकर यांचा कुणाला इशारा?
नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं; राऊतांचं थेट उषा तांबेंना पत्र, केली मोठी मागणी
राज्यातील सर्व आमदारांना छावा चित्रपट दाखणार, कोणी अन् कसे केले नियोजन
“भैया थोडा और तीखा बनाओ”; मोफत मिळालेल्या पाणीपुरीवर श्रद्धा कपूर तुटून पडली
Thane Crime News – शाळकरी मुलींचा सेल्फी काढण्याच्या बहाण्याने केला विनयभंग, आरोपीला अटक
तापमान 40 अंशांवर पोहचले; उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याचा अवकाळीचा इशारा