100 वर्ष जगायचं असेल तर हा खास चहा असा प्या; शरीरावर अमृतासारखा होईल परिणाम
प्रत्येकाला 100 वर्ष जगण्याची इच्छा असते. कुणालाच मृत्यू नको असतो. पण फारच थोडे लोक 100 वर्ष जगतात. शंभरी गाठता गाठता एवढे आजार मागे लागतात की लोक वयाच्या 70 ते 80 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतात. पण आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही 100 वर्ष जिंकण्याची शक्यता अधिक वाढेल. जर कोणताही आजार नसेल तर या गोष्टीमुळे तुम्ही आरामशीर शंभर वर्ष जगाल. त्यासाठी आम्ही तुम्हाला एका खास चहाबद्दल सांगणार आहोत. ही चहा मेडिसिनल आहे. शरीरासाठी अमृतच जणू. 2022च्या एका स्टडीत असं दिसून आलंय की, जे लोक दिवसातून दोनदा दोन कप ब्लॅक कॉफी पितात, त्यांचा वेळेपूर्वी मरण्याची आशंका 9 ते 13 टक्क्यांनी कमी होते.
ब्लॅक चहामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. ब्लॅक टीमुळे जीवनाची गुणवत्ता वाढते, त्यामुळे वय वाढते, असं अनेक अभ्यासातून दिसून आलं आहे. ब्लॅक टी हार्ट अटॅकसाठी लाभकारी आहे. कारण त्यात अँटिऑक्सिडेंट्स असतात. इतर चहाच्या तुलनेत ब्लॅक टीची पत्ती पूर्णपणे ऑक्सिडाइज असते. त्यात ज्या पद्धतीने अँटिऑक्सिडेंट्स बनतात, ते याने जात नाही. यात फ्लेवेनोएड आणि थीएफ्लाविन्स कपाऊंड अधिक असातात, ज्यामुळे शरीरात क्रोनिक आजार होत नाही. क्रोनिक आजार म्हणजे स्थूलता, मधूमेह, हार्ट, लिव्हरचा आजार. हे अँटी इंफ्लामेटरी आहे, त्यामुळे अनेक आजार होण्यापासून संरक्षण होतं. ब्लॅक टी ब्लड प्रेशर लेव्हल कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. ते शरीरात इन्फ्लामेशन कमी करण्याचं काम करतात. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे कॅन्सर, मधूमेह, स्ट्रोकचा धोका कमी होतो.
पण अशी बनवली तर…
ब्लॅक टी शरीरासाठी अमृत आहे. पण ती खास पद्धतीने तयार केली तरच फायदा होतो. सर्वात आधी तुम्ही ब्लॅक टीमध्ये दूध आणि साखर टाकली तर त्याचा फायदा होणार नाही. भारतात लोक विना दूध आणि साखरेशिवाय चहा पितच नाही. साखर ब्लॅक टीमधील अँटिऑक्सिडेंटसोबत प्रतिक्रिया करायला सुरुवात करेल. त्यामुळे त्याचा फायदा होणार नाही. साखरेऐवजी तुम्ही त्यात गोडसारखं वेगळं काही टाकू शकता. म्हणजे मोंक फ्रूट वगैरे. यासोबतच ब्लॅक टीमध्ये चहाच्या पानांचा वापर करा. जर हे प्रोसेस्ड केलेले पानं असतील तर त्याचा फार कमी फायदा होईल. ब्लॅक टीला पाण्यात तीन ते पाच मिनिटं उकळून घ्या. ब्लॅक टीमध्ये लिंबू, अदरक, किंवा दालचिनी टाकली तर त्याचा अधिकच फायदा होईल.
किती वेळा प्याल
ब्लॅक टी फक्त दोनदाच प्या. दोन कपाहून अधिक ब्लॅक कॉफी पिण्याचा काहीच फायदा नाही. वेगवेगळ्या प्रकारे ब्लॅक टी प्या. म्हणजे कधी दार्जिलिंग तर कधी आसाम चहा. झोपण्यापूर्वी ब्लॅक टी पिऊ नका. एक लक्षात घ्या, केवळ ब्लॅक टी पिऊन शंभर वर्ष जगता येत नाही. त्यासाठी हेल्दी लाइफ जगलं पाहिजे.
( सूचना – ही माहिती सर्व सामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करावा )
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List