रात्रीच्या जेवणानंतर फॉलो करा ‘या’ 4 सवयी, वजन राहील नियंत्रणात
वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेकजण हेल्दी डाएट, निरोगी आहार तसेच व्यायाम करत असतात. कारण स्लिम आणि हेल्दी राहणे ही प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी काही सवयींबरोबरच योग्य आहार आणि व्यायामाचे पालन करणे आवश्यक आहे. हे आपल्या शरीराच्या चयापचय आणि वजन कमी करण्यावर परिणाम करतात. बदलती जीवनशैली आणि आहारातील व्यत्ययामुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढत आहे.
न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवाल सांगतात की, जर तुम्हाला स्लिम राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणानंतरच्या सवयींकडे लक्ष द्यायला हवं. हे तुम्हाला केवळ वाढत्या वजनापासून मुक्त होण्यास मदत करू शकत नाही तर हेल्दी वजन राखून ठेवण्यास देखील मदत करू शकतात. चला जाणून घेऊया रात्रीच्या जेवणानंतर कोणत्या सवयी पाळल्या पाहिजेत.
हलके चालणे
रात्री जेवल्यानंतर तुम्ही जर लगेच झोपत असाल तर असं करणे थांबवा. कारण रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने पचनक्रिया मंदावते त्यामुळे जेवणानंतर १०-१५ मिनिटे हलके वॉक करा. या सवयीमुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि शरीराचे चयापचय वेगवान होते. एवढंच नाही तर हलके चालल्याने अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यास मदत करते. तसेच चालल्याने मानसिक स्थिती देखील सुधारू शकता, ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते.
स्नॅकिंग टाळा
रात्रीच्या जेवणानंतर लोकांना बऱ्याचदा हलका स्नॅक्स खाण्याची सवय असते, परंतु हलक्या स्नॅक्समुळे तुमचे वजन वाढू शकते. रात्री शरीराची चयापचय क्रिया मंदावते. परंतु त्यानंतर सुद्धा तुम्हाला जर पुन्हा भूक लागल्यासारखे वाटते तेव्हा तुम्ही हेल्दी नटसचे सेवन करा. रात्रीच्या जेवणानंतर तेलकट पदार्थ खाणे शक्यतो टाळा.
स्क्रीन टाइम कमी करा
रात्रीच्या जेवणानंतर तुमच्या शरीराला पुरेशी विश्रांती देणे महत्वाचे आहे. झोपण्यापूर्वी जास्त स्क्रीन टाइम म्हणजे मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्ही बघणे टाळा कारण यामुळे तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. चांगली झोप तुमच्या शरीराचे चयापचय सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. झोपण्याच्या किमान एक तास आधी गॅझेट्सचा वापर करू नका.
तसेच रात्रीच्या जेवणानंतर साखरयुक्त पदार्थ खाऊ नयेत. साखर कॅलरीची संख्या वाढवू शकते आणि झोपेत देखील व्यत्यय आणू शकते. त्यामुळे स्वतःला ही शारीरिकरित्या ऍक्टिव्ह ठेवा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List