ही दहा वेळा साड्या बदलणारी माणसं; विखे पाटलांना संजय राऊतांचा लय बेक्कार टोला
उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जोरदार बॅटिंग केली. त्यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तोंडसुख घेतले. तर या दरम्यान त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विखारी टीका केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यावरून राज्यात वातावरण तापण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांची विखे पाटलांवर विखारी टीका
महसूल मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. कोण विखे पाटील जे दहा वेळा पक्ष सोडून पळून गेले. त्यांना मंत्री पद पहिले शवसेनेने उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. त्यांनी विसरू नये. त्यांनी अनेक पक्ष बदललेले आहे. दहा वेळा साड्या बदलणारी लोक आहेत हे त्यांनी आम्हाला शिकवू नये काय आहेत ते, असा टोला राऊतांनी लगावला.
तुम्हाला देखील धक्का बसेल भविष्यात विसरू नका. धक्का बसू नये म्हणून तुम्ही पक्ष बदलत आहेत. हिम्मत आणि धाडस असते तर पक्ष बदलले नसते. ज्या काँग्रेस पक्षांनी तुम्हाला सर्व काही दिलं मानपान प्रतिष्ठान सत्ता शिवसेनेने देखील तुम्हाला दिला आहे. त्या शिवसेनेबद्दल तुम्ही असं वक्तव्य करतात हा निर्लज्य आणि नीचपणा आहे, असा घणाघात त्यांनी घातला.
काय केली होती विखेंनी टीका
उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळलं आहे. ते बेताल विधान करत आहेत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णय योग्य आहे. हे कायद्याचे राज्य आहे. असी जळजळीत टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. प्रचार गीतावरून निवडणूक आयोगाने नोटीस दिली होती. गाण्यातील जय भवानी शब्द हटवण्यावरून हा वाद होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आयोगावर टीका केली होती. त्यानंतर आता संजय राऊत यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली. त्यामुळे हा वाद उफाळला आहे. त्यावर आता विखे पाटील समर्थकांकडून काय उत्तर येते, ते समोर येईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List