मी तिकडचा डॉक्टर नाही, मी सिंधुदुर्गचा डॉक्टर; नितेश राणे यांचं सूचक विधान
शिवसेनेत येणाऱ्यांची लाईन खूप मोठी आहे. अनेक लोक आहेत जी आमच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. आपण टप्प्या टप्प्याने त्यांना पक्षात घेणार आहोत. जे येणार त्यांचे स्वागतच करणार असे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे. राजन साळवी देखील येण्यास राजी असतील तर त्यांनी यावे, आमच्यातल्या कोणाचा त्यांना कशाला विरोध असेल असाही दावा निलेश राणे यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतू किरण सामंत यांचा त्यांच्या प्रवेशाला विरोध असल्याचे म्हटले जात आहेत. यावर निलेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले की मला असं काही असेल असं वाटत नाही. ‘ऑपरेशन टायगर’ रत्नागिरीमध्ये होत आहे की नाही याची मला कल्पना नाही. मी तिकडचा डॉक्टर नाही मी सिंधुदुर्गचा डॉक्टर आहे अशी मिश्कील टीपण्णीही निलेश राणे यांनी यावेळी केली आहे.
राऊत यांनी असंच बोलत रहावं
संजय राऊत हे नेहमी काही नाही काही बोलत असतात. त्यांना रोज काय उत्तर द्यायचं ? संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचा पत्ता राजकारणातून कट करून टाकला आहे. हे कधी तुम्ही कधी बोलणार आहात की नाही ? उद्धव ठाकरे यांना राजकीय दिवाळखोरीत टाकले. उद्धव ठाकरे यांचा वेळोवेळी काटा कोणी काढला, पवारांचा माणूस आतमधून कोण आहे हे उद्धव ठाकरे यांना कळेल. संजय राऊत यांच्या अशाच बोलण्यामुळे महाराष्ट्रातील लोक आमच्याकडे वळली आहेत. संजय राऊत यांच्या तिरस्काराचा फायदा आम्हाला होतो. संजय राऊत यांनी असंच बोलत रहावं असा सल्लाही निलेश राणे यांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी हे सरकार येड्याची जत्रा आहे अस व्यक्तव्य केल होतं यावर बोलताना हे कोण येडाच बोलतोय ना ?, हा तर कहर आहे, तू कोण? तू जत्रेमधलाच वेडा आहे. संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही, कोणाला काय बोलावं, किती बोलावं? त्यामुळे याच्यावर मी जास्त बोलू इच्छीत नाही असे निलेश राणे म्हणाले.
राहुल नशेत असल्यासारखे बोलतात
राहुल गांधी हे नशेत असल्यासारखं बोलतात. राहुल गांधी हे शुद्धीत आहेत की नाही हा आम्हाला प्रश्न पडला आहे. दिल्लीच्या निकालानंतर गांधी यांनी तीन वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत. ज्यांना हिमाचलची लोकसंख्या किती ते माहीत नाही ते महाराष्ट्राच्या निकालावर बोलतात त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही असे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List