10 हजारांचा दंड ठोठावताच उदित नारायण कोर्टात हजर, पत्नी म्हणाली, मुंबईत गेल्यावर मागे लागतात गुंड

10 हजारांचा दंड ठोठावताच उदित नारायण कोर्टात हजर, पत्नी म्हणाली, मुंबईत गेल्यावर मागे लागतात गुंड

बॉलिवूड गायक उदित नारायण झा शुक्रवारी बिहारमधील सुपौल येथील कुटुंब न्यायालयात हजर झाले. त्यांची पहिली पत्नी रंजना यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणात ते व्यक्तिशः हजर झाले. यापूर्वी त्यांना अनेकदा सांगूनही ते हजर झाले नव्हते. त्यामुळे कोर्टाने त्यांना 10 हजारांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर ते कोर्टासमोर हजर झाले. कुटुंब न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहुल उपाध्याय यांनी त्यांना 28 जानेवारी 2025 रोजीपर्यंत उत्तर दाखल करण्यास मुदत दिली होती. सुनावणीदरम्यान कोर्टाने रंजना झा आणि उदित नारायण यांची बाजू ऐकली. दोघांचे समुपदेशन केले. उदित नारायण यांनी भविष्यात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी घेण्याची विनंत केली. उदित नारायण यांनी कोणतीही तडजोड करण्यास नकार देत केस लढण्याचे ठरवल्याची माहिती त्यांची पहिली पत्नी रंजना झा यांनी दिली.

उदित नारायण यांची बाजू काय?

गायक उदित नारायण यांच्या मते, बिहार राज्य महिला आयोग, पाटणा यांच्यासमोर दोन्ही पक्षात तडजोड झाली. महिला आयोगाने 4 जुलै 2023 रोजी पहिल्या पत्नीचा अर्ज फेटाळला होता. उदित नारायण हे पत्नाला प्रति महिना 15 हजार रुपये गुजारा भत्ता, पोटगी देत असल्याचे महिला आयोगासमोर आले होते. जानेवारी 2021 पासून ही रक्कम 15 हजाराहून 25 हजार रुपये प्रति महा करण्यात आली होती. उदित नारायण अजूनही रक्कम देत आहेत. तर रंजना यांना एक कोटींचे घर सुद्धा देण्यात आले आहे.

एक शेतीचा तुकडा आहे. त्यावर एक छोटी खोली बांधण्यात आली आहे. रंजना यांनी ही खोली भाड्याने दिली आहे. त्यातून त्यांना दरमहा 6 हजार रुपये किराया मिळतो. तर उदित यांच्याकडून 25 लाख रुपयांचे दागिने देण्यात आले आहेत. एक जमीन रंजना यांना देण्यात आली होती. ती त्यांनी विक्री केली. पाटणा येथे एक फ्लॅट खरेदी केला आहे. पण जमीन मालक आणि विकासक यांच्यातील वादामुळे त्याचा ताबा मिळू शकला नाही. आपल्याकडून पैसे वसूल करण्यासाठी रंजना यांनी कुटुंब न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याचा आरोप उदित यांनी केला.

दरम्यान रंजना झा यांनी उतारवयात आता पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. औषधे आणि देखभालीसाठी पतीची गरज असल्याची बाजू त्यांनी मांडली. तर उदित नारायण यांनी पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मर्सिडीजवरून राजकारण तापलं! विनायक राऊतांचा गोऱ्हेंवर पलटवार, म्हणाले शपथ घेऊन सांगा.. मर्सिडीजवरून राजकारण तापलं! विनायक राऊतांचा गोऱ्हेंवर पलटवार, म्हणाले शपथ घेऊन सांगा..
दिल्लीमध्ये आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव...
नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर वातावरण तापलं, ठाकरे गटाच्या नेत्यानं कुंडलीच मांडली, मागितला 18 मर्सिडीजचा हिशोब
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक, वेळापत्रक काय?
‘बाबू काबूच्या बाहेर असतो, महिन्यातून किमान 20 वेळा तरी…’ ; प्रसिद्ध अभिनेत्रीनेच कास्टिंग काऊचबाबत सगळं सांगितलं
बच्चन कुटुंब आणि ‘या’ अभिनेत्यामध्ये 30 वर्षांपासून कट्टर शत्रूत्व; एकत्र काम न करण्याची घेतली शपथ
‘हा’ एक बदल केला असता तर ‘छावा’मधली ती भूमिका आणखी खुलली असती; तुम्हाला काय वाटतं?
महाकुंभमध्ये डुबकी मारल्यानंतर पवन कल्याण रुग्णालयात दाखल; नदीतील प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित