भावाच्या लग्नात रणबीर-आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, म्हणाले,’संस्कार असावेत तर असे…’
सध्या बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री सर्वत्रच लगीनघाई सुरु आहे. त्यात आता कपूर घराण्यातही लग्नाचं वातावरण आहे. रणबीर कपूरचा भाऊ आदर जैन नुकताच लग्नबंधात अडकला. आदर जैनने शुक्रवारी 21 फेब्रुवारीमध्ये मुंबईत लग्न केलं. आदरने त्याची गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीबरोबरच लग्न केलं आहे. लग्नात संपूर्ण कपूर फॅमिली उपस्थित होती. लग्नघराचे, लग्नाचे सर्व फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअरही करण्यात आहेत.
21 फेब्रुवारीला पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा
दरम्यान हे जे लग्न झालं ते हिंदू रितीरिवाजानुसार झालं पण त्याआधी महिनाभरापूर्वी आदर आणि अलेखा यांनी 12 जानेवारीला गोव्यात ख्रिश्चन पद्धतीनेही लग्न केलं होतं. आणि आता 21 फेब्रुवारीला ते पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नातील तसेच सर्व समारंभातील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. दरम्यान, त्यांच्या मेहंदी सोहळ्यातील आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
रणबीर-आलियाच्या त्या व्हिडीओने जिंकली चाहत्यांची मने
अभिनेता आदर जैन आणि आलेखा यांच्या विवाहसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. याच दरम्यानचा आलिया आणि रणबीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया आणि रणबीर घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
‘आदर्श जोडपं’ असा टॅग
रणबीर आणि आलिया प्रत्येक सदस्याच्या जवळ जाऊन खाली वाकून त्यांच्या पाया पडत आहेत. त्यांच्या या कृतीचं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. तसेच त्यांचं कौतुकही केलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांनी ‘आदर्श जोडपं’ असा टॅग सुद्धा दिला आहे.एवढंच नाही तर काही युजर्सने ‘संस्कार असावेत तर असे’ अशी कमेंटही त्यांच्या या व्हिडीओवर केली आहे.
लग्नाला अनेक सेलिब्रिटींचीही हजेरी
कपूर कुटुंबातील लग्नसोहळा म्हणून आदर जैन आणि आलेखा अडवाणी यांच्या लग्नाची आधीपासूनच जोरदार चर्चा होती. त्यांच्या लग्नाला करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, नीतू कपूर, रणबीर व आलिया, रिद्धीमा कपूर, तिची लेक समायरा, श्वेता बच्चनचे पती निखिल नंदा व त्यांचा मुलगा अगस्त्य नंदा, अनिल अंबानी व टीना अंबानी, आकाश अंबानी व श्लोका मेहता अशा सर्वांनी हजेरी लावली होती. त्यातच आता रणबीर आणि आलियाच्या या व्हिडीओचीही चर्चा होतेय.
दरम्यान, आदर जैनच्या कामाबद्दल सांगायंच तर त्याने ‘कैदी बँड’, ‘मोगुल’ आणि ‘हॅलो चार्ली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय अभिनेता तारा सुतारियासोबतच्या रिलेशनशिपमुळे अनेकदा तो चर्चेतही आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List