तुम्ही पण लिव्हिंग इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या विचारात आहात का!! जाणून घ्या या रिलेशनशिपचे फायदे

तुम्ही पण लिव्हिंग इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या विचारात आहात का!! जाणून घ्या या रिलेशनशिपचे फायदे

काळ बदलला आणि लग्नाच्या व्याख्या बदलल्या. एक काळ होता जिथे आई वडिल लग्नासाठी सून आणि जावई यांची निवड करायचे. तो काळ केव्हाच मागे पडला आणि प्रेम विवाहाची चलती सुरु झाली. मान्यता असलेले प्रेमविवाह समाजातील कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय ठरले. पण याहीपलीकडे जाऊन आता अलीकडील मुलं मुली मात्र लग्नापेक्षा लिव्हिंग इनला जास्त पसंती देताना दिसत आहेत. भरमसाठ पैसा ओतून लग्न करुन नंतर घटस्फोटाला सामोरे जाण्यापेक्षा सर्वात आधी लिव्हिंग इन राहून बघुया असा ट्रेंड वाढू लागला आहे. मुख्य म्हणजे या नवीन विचारांच्या बदलांना आता आईवडिलांनाही हिरवा कंदील दाखवला आहे.
लिव्हिंग इन म्हणजे लग्नाआधी एकमेकांसोबत काही काळ एकत्र राहणे ही पद्धत आता तरुणांमध्ये चांगलीच रुजली आहे. असं म्हणतात की, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. आता आपण जाणुन घेऊया लिव्हिंग इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे काय होतात फायदे.
एकमेकांना समजून घेण्यासाठी
जोडीदार कसा आहे हे समजून घेण्यासाठी लिव्हिंग इन हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे. आपण ज्याच्यासोबत किंवा जिच्यासोबत लग्न केल्यानंतर राहणार आहोत, ती व्यक्ती कशी आहे हे कळणं खूपच गरजेचं असतं. म्हणूनच लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यास नंतरचा प्रवास अधिक सुखकर होतो.
व्दिधा मनःस्थिती
आजही लग्न करावं की नाही करावं अशी व्दिधा मनःस्थिती असणारे अनेकजण आहेत. अशा कपल्ससाठी लिव्हिंग इन हा एक बेस्ट पर्याय आहे. किमान नातेसंबंधांची यामुळे जाण निर्माण होते. समोरच्या व्यक्तीसोबत आपण खरोखर जुळवून घेऊ शकतो का याची जाण होते.
एकमेकांची उत्तम ओळख
लिव्हिंग इन मध्ये एकमेकांना उत्तम पद्धतीने जाणून घेता येते. एकमेकांच्या सवयी काय आहेत हे कळते. शिवाय एखादी आवड निवड जुळते की नाही हे सुद्धा समजते. काही गोष्टी या आधी माहित असल्यानंतर, नंतरचा प्रवास हा खूप सोपा होतो.
जबाबदारीची जाणीव
एकत्र राहिल्यामुळे दोघांनाही आपल्या जबाबदारीची जाणीव होते. एकदा का जबाबदारी कळली की, पुढच्या गोष्टी सोप्या होतात. एकत्र राहताना एकमेकांच्या सवयींसह अनेक गोष्टीची जाणीव आपल्याला होते.
भावनिक जवळीक
प्रत्येक नात्यामध्ये भावना ही खूपच महत्त्वाची मानली जाते. नात्यामध्ये भावना असणं हे एक उत्तम माणूस असण्याचं लक्षण आहे. एकमेकांसोबत काही काळ व्यतित केल्यानंतर, एकमेकांविषयी आदरयुक्त भावना निर्माण होते. कुठल्याही नात्यामध्ये आदरयुक्त भावना असणं हे चांगले लक्षण मानले जाते.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल
राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री सध्या विरोधकांच्या रडावर आले आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी...
ही दहा वेळा साड्या बदलणारी माणसं; विखे पाटलांना संजय राऊतांचा लय बेक्कार टोला
10 हजारांचा दंड ठोठावताच उदित नारायण कोर्टात हजर, पत्नी म्हणाली, मुंबईत गेल्यावर मागे लागतात गुंड
भारतात स्त्री सुरक्षा वाऱ्यावर? भूमी पेडणकर म्हणते, ‘भारतात महिला म्हणून वावरायला भीती वाटते…’
प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी ‘छावा’ने दिला सर्वांनाच झटका; शाहरुख-रणबीरही हादरले
भावाच्या लग्नात रणबीर-आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, म्हणाले,’संस्कार असावेत तर असे…’
प्रसिद्धीसाठी कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला हिना खानचं उत्तर; म्हणाली..