Delhi Election Result – अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची मोजणी झाली असून त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी होईल. पोस्टल मतांमध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे.
सुरुवातीच्या कलांनुसार आम आदमी पार्टीचे तीन प्रमुख नेते पिछाडीवर आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर आहेत. नवी दिल्ली मतदारसंघातून केजरीवाल, जंकपुरा मतदारसंघातून सिसोदिया आणि काकलाजी मतदारसंघातून आतिशी पिछाडीवर आहेत. पोस्टल मतांचे हे कल असून ईव्हीएम उघडल्यानंतर यात बदल होण्याची शक्यता आहे.
As per early official trends, BJP leading in Vishwas Nagar and Shahdara assembly seats out of the total 70 seats in Delhi#DelhiElections2025 https://t.co/GMgILZrcTR pic.twitter.com/hlOgMsbull
— ANI (@ANI) February 8, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List