मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डाऊन दिशेच्या गाड्या पूर्णपणे ठप्प

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डाऊन दिशेच्या गाड्या पूर्णपणे ठप्प

मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. टिटवाळा-खडवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. यामुळे डाऊन दिशेच्या सर्वच लोकल गाड्या पूर्णपणे बंद झाल्या असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कसाऱ्याहून येणारी “गरीब रथ मेल” आसनगावला थांबवण्याची शक्यता आहे.

कसारा लोकलचा प्लॅटफॉर्म ओव्हरशूट

दरम्यान कसारा लोकलचा प्लॅटफॉर्म ओव्हरशूट झाल्याची घटना समोर आली आहे.  मुलुंड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून लोकल दोन डबे पुढे गेली.  हा संपूर्ण प्रकार मंगळवारी सकाळी 9 वाजून 23 मिनिटांनी घडला, त्यानंतर लोकल 10 मिनिटं खोळंबली होती. त्यामुळे काही प्रवाशांना रुळांवर उतरून प्लॅटफॉर्मवर यावे लागले,  तर मागच्या डब्यांतील प्रवाशांना गाडीत चढणे अतिशय कठीण झाले. गर्दीच्या वेळेस हा प्रकार झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

मोटरमन के.जी. भावसार आणि ट्रेन मॅनेजर व्ही. सिंगापूर यांनी ही लोकल चालवली होती. मोटरमन ब्रेक वेळेवर न लावल्याने लोकल नियोजित ठिकाणी न थांबता पुढे गेल्याचे समोर आले आहे.

प्लॅटफॉर्म ओव्हरशूट हा गोंधळाचा प्रकार असला तरी Signal Passing at Danger (SPAD) पेक्षा कमी धोकादायक आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले असून भविष्यातील उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे.

चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाचवला जीव

लोकलमधून पडून प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. असाच एक प्रकार अंधेरी स्थानकात घडणार होता, मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशाचा जीव वाचला.

अंधेरी रेल्वे स्थानकजवळर चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाचवले. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर चालत्या ट्रेनमधून एक प्रवासी पडला. मात्र ट्रेन रुळाच्या मध्यभागी येण्यापूर्वीच रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवले. हनुमंत शिंदे आणि संदीप मराठे अशी त्या प्रवाशाचे प्राण वाचवणाऱ्या एमएसएफ सैनिकांची नावे आहेत.

हमसफर एक्सप्रेस साडे 17 तास उशीराने

दरम्यान गोरखपूर ते वांद्रे टर्मिनस अशी धावणारी हमसफर एक्सप्रेस साडे 17 तास उशिराने धावत आहे. ट्रेनला उशीर झाल्यामुळे प्रवासी नाराज आणि संतप्त आहेत. हमसफर एक्सप्रेस ही सकाळी 8.30 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचणार होती, मात्र ती आता पहाटे 2 वाजता पोहोचण्याची अपेक्षा आहे. ही  एक्सप्रेस इतक्या उशिरा का धावत आहे, याची प्रवाशांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही अथवा कोमतीही घोषणाही केलेली नाही.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आनंदवार्ता, मुंबईकरांचा प्रवास एकदम स्वस्तात, वाहतूक कोंडी छुमंतर, बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाचा हिरवा कंदिल आनंदवार्ता, मुंबईकरांचा प्रवास एकदम स्वस्तात, वाहतूक कोंडी छुमंतर, बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाचा हिरवा कंदिल
मुंबईत बाइक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. ही मुंबईकरांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा...
घटस्फोटानंतर सानिया मिर्झाचं ‘लव्हलेटर’ समोर, सायना नेहवालचा नवरा म्हणाला…
रवीना टंडनने तिचे सोन्याचे कानातले काढून थेट पापाराझीला गिफ्ट म्हणून दिले; लेक पाहतच राहिली
सैफ अली खान – करीना कपूर यांचा दीड वर्षात होणार घटस्फोट? ‘हा’ आहे पुरावा
सलमानसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री अबू आझमी कुटुंबाची सून कशी बनली? मुस्लीम धर्मही स्वीकारला
मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठीच; भैयाजी जोशी यांनी माफी मागावी, आदित्य ठाकरे कडाडले
सकाळची सुरुवात कोमट पाण्यासोबत करा, निरोगी आणि तंदुरुस्त राहाल! वाचा