महायुती सरकारचा गरीबांच्या आरोग्याशी खेळ, अस्तित्वातच नसलेल्या कंपनीकडून शासकीय हॉस्पिटलमध्ये बनावट औषध खरेदी
अस्तित्वातच नसलेल्या कंपनीकडून राज्यातील विविध सरकारी महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये उत्तराखंडमधील एका पंपनीकडून औषधांची खरेदी केली; पण ही पंपनी अस्तित्वातच नाही. बनावट औषधे उत्पादित करण्यात आली आहेत. या प्रकरणी ठाण्यातील दोघांना अटक करण्यात आल्याची कबुली अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज विधानसभेत दिली. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हा औषध खरेदी घोटाळा उघड केला.
शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे बोगस औषध खरेदीचा घोटाळा बाहेर काढला. सरकारी रुग्णालयांमध्ये भेसळयुक्त औषधांचा पुरवठा झाला आहे. औषधांमध्ये अपेक्षित असलेले कोणतेही घटक यामध्ये नव्हते. याची चाचणी केली असता त्यात आरोग्यासाठी हानिकारक घटकांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब पुढे आल्याचे सुनील प्रभू यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. त्यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले की, औषध पंपनी उत्तराखंडमधील आहे, पण ती अस्तित्वातच नाही. त्याचा सखोल तपास केला असता, ठाणे जिह्यातील अँक्टीव्हेंटिस बायोटेक व पॅबिज जेनेरीक हाऊसमार्फत औषध खरेदी झाली आहे. या प्रकरणी दोघांना अटक झाली झाल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.
कंपनी अस्तित्वात नसेल तर हा प्रस्ताव शासनासमोर कोणी आणला, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला. या प्रस्तावाला मंजुरी कोणी दिली? यामध्ये मंत्र्यांसहित अधिकारी कोणीही दोषी असतील त्यांच्यावर सरकार काय कारवाई करणार? औषधे खरेदी केल्याचा प्रस्ताव कोणी आणला? औषधे खरेदी केली त्यांना त्वरित निलंबित करायला पाहिजे; पण मंत्री त्यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप सुनील प्रभू यांनी केला. सुनील प्रभू यांच्या मागणीला भाजप सदस्य अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार यांनीही पाठिंबा देत या प्रकरणी अधिकाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली.
दोषी अधिकाऱयांवर कारवाई होणार!
अधिवेशन संपण्याच्या आत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. संबंधित अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे. अधिकाऱयांच्या विरोधात त्वरित कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या सदस्यांनी केली, पण त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन सरकार देत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत सभात्याग केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List