पोटातील ओठांवर…घाटकोपरची भाषा गुजराती; RSS च्या ज्येष्ठ नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
मुंबईत मराठी भाषिकांची होणारी गळचेपी आणि मराठीत बोलणार नाही, असा परप्रांतीयांचा उद्दामपणा दिसून येत आहे. त्यातच मराठी भाषकांना मारहाण झाल्याचा किंवा मराठी असल्याने नोकरी नाकारल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव आता जनतेला कळला आहे. त्यातच आता राष्ट्रीय स्वंयसेवर संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठीबाबत असेच वादग्रस्त वक्तव्य केल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे.
मुंबईत येणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे, मराठीत बोललचं पाहिजे, अशी भूमिका मराठी भाषा प्रेमी आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेल्यांनी घेतली आहे. माय मराठी बोलीचा वापर वाढला पाहिजे हीच मराठीजनांची भूमिका आहे. मात्र, मुंबईचे महत्त्व सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असे वक्तव्य केलं आहे. तसेच घाटकोपरची भाषा मराठी आहे, असे विधान केल्याने मराठी जनता संतप्त झाली आहे. त्यांनी हे वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासमोर केले. मात्र, त्यांनी पक्षाच्या धोरणाप्रमाणे याबाबत मौन धारण केले.
मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केले आहे. त्यामुळे, आता त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठी प्रमींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच घाटकोपर हे महाराष्ट्रात आणि मुंबईत आहे. महाराष्ट्राची आणि मुंबईची भाषा मराठी असताना घाटकोपरची भाषा गुजराती कशी, असा सवालही जनता करत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List