छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर यांना अटक करा! विधान परिषद सभागृहात विरोधकांचा ठिय्या

छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर यांना अटक करा! विधान परिषद सभागृहात विरोधकांचा ठिय्या

औरंगजेब क्रूर नव्हता, असे म्हणणाऱ्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांचा निषेध करत सरकारने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाहीर अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात सरकार कारवाई तर करत नाही, पण त्यांचे संरक्षण करत आहे. राहुल सोलापूरकर यांना तर पारितोषिक दिले जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱया महाराजांचा अपमान करणाऱया प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना तत्काळ अटक करा. सभागृहात याबाबत सविस्तर चर्चा झाली पाहिजे. तोपर्यंत हे सभागृह चालू देणार नाही, असा इशारा देत महाविकास आघाडीच्या सदस्यांनी विधान परिषदेत सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभागृहातच ठिय्या आंदोलन केले.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या तिसऱया दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषदेत 289द्वारे स्थगन प्रस्ताव मांडत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱया प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना अटक करण्याची मागणी करत कामकाज रोखून धरले. विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याआधीही विरोधकांनी पायऱयांवर निषेध आंदोलन करत कोरटकर आणि सोलापूरकर यांच्या अटकेची मागणी केली होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱया कोणालाही सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महाराजांवर विशेष चर्चा होणार

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर सतत होणाऱया विधानाबाबत विशेष चर्चा धडवून आणावी, अशी विनंती विरोधी पक्षनेते दानवे यांनी सभापतींकडे केली. सभापतींनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण करण्याची सूचना केली. या वेळी महाराजांच्या विषयावर विशेष चर्चा घडवून आणली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आनंदवार्ता, मुंबईकरांचा प्रवास एकदम स्वस्तात, वाहतूक कोंडी छुमंतर, बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाचा हिरवा कंदिल आनंदवार्ता, मुंबईकरांचा प्रवास एकदम स्वस्तात, वाहतूक कोंडी छुमंतर, बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाचा हिरवा कंदिल
मुंबईत बाइक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. ही मुंबईकरांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा...
घटस्फोटानंतर सानिया मिर्झाचं ‘लव्हलेटर’ समोर, सायना नेहवालचा नवरा म्हणाला…
रवीना टंडनने तिचे सोन्याचे कानातले काढून थेट पापाराझीला गिफ्ट म्हणून दिले; लेक पाहतच राहिली
सैफ अली खान – करीना कपूर यांचा दीड वर्षात होणार घटस्फोट? ‘हा’ आहे पुरावा
सलमानसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री अबू आझमी कुटुंबाची सून कशी बनली? मुस्लीम धर्मही स्वीकारला
मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठीच; भैयाजी जोशी यांनी माफी मागावी, आदित्य ठाकरे कडाडले
सकाळची सुरुवात कोमट पाण्यासोबत करा, निरोगी आणि तंदुरुस्त राहाल! वाचा