Chandrapur शहराजवळील मोरवा येथे भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
चंद्रपूर शहराजवळ मोरवा येथे भीषण आगीची घटना उघडकीस आली आहे. ईगल नामक ढाब्याच्या मागे असलेल्या अवैध गौदामाला ही आग लागली. यामुळे गोदामाजवळ असलेल्या भंगार गोदामाला देखील आग लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, डीझेल- ऑइलच्या अवैध साठ्याला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. महामार्गालगत असलेल्या या अवैध डिझेल आणि भंगार गोदामाला आग लागली आहे. ही जागा नक्की कुणाच्या मालकीची याबाबत संभ्रम आहे. पोलीस आणि महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List