… तर कंपन्या मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये आल्या असत्या, दावोसमधील करारावरून वरुण सरदेसाईंचा हल्ला

… तर कंपन्या मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये आल्या असत्या, दावोसमधील करारावरून वरुण सरदेसाईंचा हल्ला

परदेशातील गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी दावोसमध्ये जाऊन सरकारने 15 लाख 70 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले पण यातील बहुतांश पंपन्या महाराष्ट्रातीलच आहेत. दावोसला जाऊन एवढा खर्च करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील पंपन्यांना पह्न केले असते तर या सर्व पंपन्या मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये आल्या असत्या. मुंबईतच सामंजस्य करार झाले असते अशा शब्दात शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी आज सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना वरुण सरदेसाई त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक सीमा प्रश्न, मुंबईतील रस्त्यांची कामे, दावोसमधील करार, एमआयडीसीतील भूखंडाचे वितरण यावरून सरकारवर कडाडून टीका केली. जानेवारी 2025 दावोसमध्ये 15 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले. पण हा आकडा जरी मोठा दिसत असला तरी यातील बहुतांश पंपन्या महाराष्ट्रातील आहेत. पण सध्या राज्याची आर्थिक परिस्थती चांगली नाही मग तरीही येवढा खर्च करून आपण दावोसला गेलो पण यातून नक्की काय साध्य केले? जर मुख्यमंत्र्यांनी ठरवले असते आणि महाराष्ट्रातील पंपन्यांना पह्न केला असता तर मुंबईतच सामंजस्य करार झाले असते असे ते म्हणाले.

मुंबईतील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत. पंत्राटदार कामे करीत नाहीत. त्यांनी आगाऊ रक्कम हाती घेतली आहे. काम कुठेही होत नाही. काम सुरू नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

एमआयडीसीच्या माध्यमातून साडेतीन हजार एकर औद्योगिक भूखंड वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे असे राज्यपालांनी म्हटले आहे. पण चार दिवसांपूर्वीच वन मंत्री गणेश नाईक यांनी म्हटले आहे की, त्यांच्या विधानसभा क्षेत्रात एमआयडीसीच्या भ्रष्ट अधिकाऱयांनी ज्या जमिनीची किंमत तीन लाख रुपये मीटर असली पाहिजे. पण भ्रष्टाचार करून साठ हजार रुपयांनी विकली आहे. म्हणजे जर वन मंत्री हे स्वतः एमआयडीसीच्या अधिकाऱयांवर आरोप करीत असतील आणि शेकडो एकरचा गैरव्यवहार झाल्याचे म्हणत असतील तर साडेतीन हजार एकर जमीन वितरित करणार आहोत यामध्येही असा भ्रष्टाचार होणार का, असा सवाल त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आनंदवार्ता, मुंबईकरांचा प्रवास एकदम स्वस्तात, वाहतूक कोंडी छुमंतर, बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाचा हिरवा कंदिल आनंदवार्ता, मुंबईकरांचा प्रवास एकदम स्वस्तात, वाहतूक कोंडी छुमंतर, बाईक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाचा हिरवा कंदिल
मुंबईत बाइक टॅक्सीला परिवहन मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. ही मुंबईकरांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा...
घटस्फोटानंतर सानिया मिर्झाचं ‘लव्हलेटर’ समोर, सायना नेहवालचा नवरा म्हणाला…
रवीना टंडनने तिचे सोन्याचे कानातले काढून थेट पापाराझीला गिफ्ट म्हणून दिले; लेक पाहतच राहिली
सैफ अली खान – करीना कपूर यांचा दीड वर्षात होणार घटस्फोट? ‘हा’ आहे पुरावा
सलमानसोबत ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री अबू आझमी कुटुंबाची सून कशी बनली? मुस्लीम धर्मही स्वीकारला
मुंबई, महाराष्ट्राची भाषा मराठीच; भैयाजी जोशी यांनी माफी मागावी, आदित्य ठाकरे कडाडले
सकाळची सुरुवात कोमट पाण्यासोबत करा, निरोगी आणि तंदुरुस्त राहाल! वाचा