छमछमवरून मचमच, राज्यात पुन्हा डान्स बार सुरू करण्याचा महायुती सरकारचा घाट
तिजोरीत खडखडाट असल्याने महायुती सरकारने राज्यात डान्स बारची छमछम पुन्हा सुरू करण्याचा घाट घातला आहे. या छमछमवरून आता मचमच सुरू झाली आहे. महायुती सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे. महसूल मिळवण्यासाठी सरकार लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणार का, असा सवाल केला जात आहे.
काँग्रेसने यावरून महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डान्स बार पुन्हा सुरू करण्यास काँग्रेसचा ठाम विरोध आहे असा इशाराच दिला.
n डान्स बारमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. काहींनी घरेदारे गहाण ठेवून, शेतीवाडी विकून डान्स बारमध्ये पैसे उधळले. हा विध्वंस पाहूनच आर. आर. पाटील यांनी डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता. महायुती सरकारने पुन्हा या विकृतीला चालना देऊ नये, असे सपकाळ यांनी सांगितले.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List