प्रियांका चोप्राच्या वहिनीला लग्नानंतर होतोय याचा त्रास,दाखवल्या मानेवरील खुना; म्हणाली ‘हे काय चाललंय?’
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचं लग्न नुकतच पार पडलं. नीलम उपाध्याय ही आता प्रियांका चोप्राच्या कुटुंबात तिची वहिनी म्हणून आली आहे. या लग्नात सर्वांनीच फार एन्जॉय केलेलं पाहायला मिळालं. पण लग्नाच्या अवघ्या तीन ते चार दिवसांनीच नीलम उपाध्याय सोबत असं काही घडलं की तिने थेट ती पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
मानेवर झालेल्या लालसर खुणांचा फोटो सोशल मीडियावर
नीलमने तिच्या मानेवर झालेल्या लालसर खुणांचा फोटोच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत तिच्या मानेवर सर्व लाल चट्टे पडलेले दिसत आहेत.नीलमने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, ‘काय चाललंय?’ मला खूप त्रास होतोय.
मला वाटतं की अंगाला लावलेल्या हळदीचा सूर्यप्रकाशाशी संपर्क आल्यावर ही रिएक्शन झाली आहे. पण मी हळदी समारंभाच्या काही दिवस आधीच पॅच टेस्ट केली होती आणि तेव्हा सर्व काही ठीक होते. यावर काही उपाय आहे का?” असं म्हणतं तिने तिला झालेल्या या एलर्जीबद्दल सांगितलं आहे आणि यावर काही उपाय आहे का असं विचारलं आहे.
लग्नाच्या प्रत्येक सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर
सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम यांचे नुकतेच मुंबईत भव्य लग्न झाले. लग्नाच्या प्रत्येक सेलिब्रेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हळदी समारंभाचे फोटो देखील आहेत. खरंतर, लग्नापूर्वीच्या विधींमध्ये हळदीचा विधी एक अतिशय प्रसिद्ध विधी आहे, जो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण हळद ही अशीच एक गोष्ट आहे, जी प्रत्येक त्वचेला इतक्या सहजपणे सूट होत नाही. काहींना तिची एलर्जी असते त्यामुळे त्वचा लालसर पडते तसेच त्वचेची जळजळही होते आणि असंच काहीसं नीलमच्या बाबतीतही झालं आहे.
प्रियांकाप्रमाणेच नीलम अभिनय क्षेत्रात
नीलम उपाध्याय देखील तिच्या प्रियांकाप्रमाणेच चित्रपट जगताशी संबंधित आहे. नीलम अनेक तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘एमटीव्ही स्टाईल चेक’ केल्यावर ती प्रसिद्धी झोतात आली. 2012 मध्ये, नीलमने ‘मिस्टर 7’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिने अॅक्शन 3डी, उन्नोडू ओरू नाल आणि ओम शांती ओम मध्येही काम केलं आहे. नीलम आणि सिद्धार्थची भेट एका डेटिंग अॅपद्वारे झाली. होती.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List