वराळे गोळीबाराचा तीन आठवड्यांनंतर छडा; कंपनीच्या व्यवस्थापकाची चुलत भावानेच दिली सुपारी

वराळे गोळीबाराचा तीन आठवड्यांनंतर छडा; कंपनीच्या व्यवस्थापकाची चुलत भावानेच दिली सुपारी

तीन आठवड्यांपूर्वी घडलेल्या चाकण औद्योगिक परिसरातील वराळे येथील स्टील कंपनीतील व्यवस्थापकावरील गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात गुंडा विरोधी पथकाला यश आले. चुलत भावानेच आर्थिक व्यवहारातून 12 लाखांची सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एकूण पाच जणांचा सहभाग असून त्यातील दोघांच्या पोलिसांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून मुसक्या आवळल्या.

संग्राम उर्फ चंदन अनंत सिंग (वय – 42, रा. मारुंजी), रोहित सुधन पांडे (वय – 23, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अजय विक्रम सिंग (वय – 35, रा. हिंजवडी) असे जखमी व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

20 जानेवारी रोजी महाळुंगे येथील कैलास स्टील कंपनीच्या आवारात व्यवस्थापक अजय सिंग यांच्यावर दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली. अजय सिंग यांना दोन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास गुंडा विरोधी पथकामार्फत सुरू होता. तांत्रिक विश्लेषणात अजय सिंग यांचा चुलत भाऊ संग्राम सिंग याच्यावर पोलिसांना संशय आला. मात्र, त्याचा या गुन्ह्याशी संबंध नसेल, असा विश्वास अजय सिंग व्यक्त करीत होते. तरी देखील पोलिसांनी तपास सुरू ठेवला.

एका व्यवहारात अजय यांनी संग्राम याला मदत केली. मात्र, त्याने ठरल्याप्रमाणे व्यवहार पाळला नाही. अजय यांच्या वरिष्ठांनी त्यांना विचारणा केली. त्यामुळे अजय यांनी संग्रामकडे विचारणा केली. या कारणावरून संग्रामने उत्तर प्रदेश येथील गुन्हेगारांना अजय यांना ठार मारण्यासाठी 12 लाख रुपयांची सुपारी दिली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, फौजदार अशोक जगताप, पी. पी. तापकीर, एस. एन. ठोकळ, व्ही. एच. जगदाळे, ए. पी. गायकवाड, जी. डी. चव्हाण, एस. डी. चौधरी, व्ही. टी. गंभीरे, जी. एस. मेदगे, एस. पी. बाबा, एन. बी. गेंगजे, व्ही. डी. तेलेवार, व्ही. एन. वेळापुरे, आर. के. मोहिते, एस. टी. कदम, टी. ई. शेख यांनी केली.

आरोपींनी केली रेकी

आरोपींनी महाळुंगे येथे खोली भाड्याने घेतली. घटनेच्या पाच ते सहा दिवस अगोदर आरोपींनी वेगवेगळ्या गाड्यांमधून रेकी केली. गुन्ह्याच्या अगोदर आरोपींनी पुण्यातील नाना पेठ येथून 70 हजार रुपयांना एक दुचाकी खरेदी केली. त्याच दुचाकीचा आरोपींनी गुन्ह्यासाठी वापर केला.

जखमी भावाला रुग्णालयात भेटायला आला

संग्राम हा जखमी भावाला भेटण्यासाठी रुग्णालयात देखील येऊन गेला. त्याने पोलिसांना जराही संशय येऊ दिला नाही. मात्र, तो पोलिसांना अधिक काळ गुंगारा देऊ शकला नाही. त्याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला मध्य प्रदेश येथील एका रेल्वे स्थानकाच्या बाहेरून ताब्यात घेतले. त्याचा साथीदार रोहित यालादेखील अटक केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान “या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. गोविंदा आणि सुनीता अहुजा लग्नाच्या 37 वर्षांनी...
वजन कमी करायचंय? मग प्या हे ड्रिंक्स; महिन्याभरात वजन कमी
अमेरिकेने 4 हिंदुस्थानी कंपन्यांवर घातली बंदी; काय आहे कारण? वाचा…
Jalna News – चारही पाय तोडलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळला, परिसरात खळबळ
Mumbai Metro 3 चा फज्जा, एका फेरीत सरासरी फक्त 46 प्रवासी! रिकाम्या गाड्या अन् प्रवाशांची वाणवा
राज्य सरकारी १७ लाख कर्मचाऱ्यांची होळी आधीच दिवाळी, महागाई भत्त्यात झाली इतकी वाढ,पाहा काय झाला निर्णय
जयंत पाटील बावनकुळेंना का भेटले? आतली बातमी समोर