कट्टर शिवसैनिक ते माजी मंत्री… कोण आहेत तानाजी सावंत? त्यांची संपत्ती किती?
who is tanaji sawant : माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याच्या अपहरणाचे वृत्त काल रात्री अचानक पसरल्याने खळबळ उडाली होती. परंतू प्रत्यक्षात हे अपहरण नव्हते तर ऋषिराज हा आपल्या मित्रांसोबत थायलंड वारीला गेलेला असल्याचे उघडकीस आले आहे. ऋषिराज याने या बँकॉक वारीसाठी तब्बल ६८ लाख उडविल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात या सारवासारव केली जात आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे नाव याआधी देखील अनेकदा चर्चेत आले आहे. २०१६ मध्ये राजकारणात प्रवेश करूनही, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना पाठिंबा देणाऱ्या पहिल्या आमदारांपैकी एक असलेले तानाजी सावंत यांना आधीच्या सरकारमध्ये आणि आताही महत्त्वाची खाती मिळाली आहेत. कोण आहेत तानाजी सावंत हे पाहूयात…
वाद आणि तानाजी सावंत
एकनाथ शिंदे गटाचे नेते मंत्री तानाजी सावंत हे अनेकदा चर्चेत आले आहेत. मागे त्यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत कॅबिनेट बैठकीत बसल्यानंतर आपल्या उलट्यांसारखे होते असे वक्तव् करुन खळबळ उडवून दिली होती. आपण कट्टर शिवसैनिक आहोत. आमचे आणि राष्ट्रवादीचे विचार वेगळे असल्याने घुसमट होते अशा आशयाचे त्यांचे वक्तव्य खूपच गाजले होते. तानाजी सांवत यांनी हाफकीन इन्स्टिट्यूटला व्यक्ती म्हणून संबोधल्याचा वादही खूप गाजला. एकदा तर त्यांनी भाषणात मी महाराष्ट्राला भिकारी बनविन असे वक्तव्य केले होते. वाद आणि तानाजी सावंत यांचे नाते कायम आहे.
कोण आहेत तानाजी सावंत?
तानाजी सावंत हे आधी बांधकाम व्यावसायिक असून नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी मतदार संघातून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढविली होती. त्यांचा जन्म १ जून १९६४ साली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथे झाला आहे. त्यांचं मूळ गाव हे सोलापूर आहे. त्यांनी पुण्याच्या भारती विद्यापीठातून सिव्हील इंजिनियरिंग केले आहे. त्यानंतर त्यांनी प्राध्यापकी केली आङे. त्यांनी ९० च्या दशकात कन्स्ट्रक्शन उद्योगात प्रवेश केला. साल १९९८ मध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड़ क्षेत्रात जेएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. त्यानंतर संपू्र्ण महाराष्ट्रात सहा महाविद्यालये काढली. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी राजकीय जीवनाचा प्रवास सुरु केला.
११५.४५ कोटींची संपत्ती
आधी तानाजी सावंत अखंड शिवसेनेत असताना विधानपरिषदेचे आमदार बनले. त्यावेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांनी आपली संपत्ती ११५.४५ कोटी असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी विधान परिषदेवर निवडून आलेल्या सर्व आमदारात ते सर्वात श्रीमंत होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिवसेना युतीच्या सरकारमध्ये जल आणि माती संरक्षण मंत्री बनले. साल २०१९ च्या विधानसभा निवडणूकांत धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभेच्या जागेवरुन निवडून आले. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा सावंत उद्धव ठाकरे यांना सोडणाऱ्या आणि शिंदेंना जाऊन मिळणाऱ्या पहिल्या आमदारांत होते. जून २०२२ मध्ये भाजपाच्या पाठींब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या पावणे दोन वर्षांच्या सरकारमध्ये ते आरोग्य मंत्री बनले. यंदाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये त्यांना डच्चू मिळाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List