मराठा समाजाने शिस्तीने लाखोंचे मोर्चे काढले, कुठला न्याय मिळाला ? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

मराठा समाजाने शिस्तीने लाखोंचे मोर्चे काढले, कुठला न्याय मिळाला ? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मराठ्यात फूट पाडता अशी टीका केली आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी मी कोणाला उत्तर देण्यास बांधील नाही. मी कोणाच्या सुपाऱ्या घेऊन स्वतःचा राजकीय स्कोर सेटल करायचं काम करत नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनेचे उत्तर दिलं ते स्पष्ट उत्तर होतं, महाराष्ट्राच्या माऊलीचे उत्तर होतं, पोटचा गोळा गेल्यानंतर तिच्या मनातल्या वेदना तिने बोलून दाखवल्या. जी माणसं बोलत होती की पोलिसांवर कारवाई नको जाऊ द्या.. सोडून द्या..त्यांना त्या माऊलीने बरोबर उत्तर दिलं आहे असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

हे मोर्चा.. मोर्चा.. करतात. यांच्या सरकारसमोर लाखो मराठ्यांचे मोर्चे निघाले ? काय न्याय दिला यांनी मराठा समाजाला ? सरकारला कुठेतरी जरांगे ना बाजूला करायचं आहे. त्याच्यासाठी कोणाला तरी मोठं करायचं असे हे सरकारचे काम चालु आहे असेही आव्हाड यावेळी म्हणाले. माझा स्पष्ट मत होतं की अक्षय शिंदे याला कोर्टाने शिक्षा द्यायला हवी होती. सोमनाथ सूर्यवंशी या मागासवर्गीयाला न्याय देण्यासाठी आम्ही मोर्चे काढायचे? लाखोंचा मोर्चा बघणार नाही तोपर्यंत हे न्याय देणार नाहीत?अक्षय शिंदेचं मी कुठेही गुणगान गायलेलं नाही, तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल, पण त्याला चार फुटावरून गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही, आम्ही म्हणत नाही की अक्षय शिंदेचा खून झाला. स्वतः न्यायाधीश म्हणत आहेत अक्षय शिंदेचा खून झाला, त्याचा एन्काऊंटर झालेला नाही आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलं आहे ?

त्या शाळेचा सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेला? त्याचं फुटेज कुठे गेलं, करायचं रामने आणि भोगायचं श्या ने, का नाही आपटेंची चौकशी झाली, गुन्हा नोंदवायला का सात तास लागले या सर्व प्रश्नांची उत्तरं कधी मागितली का ? असाही सवाल सुरेश धस यांना जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता, तुमचं एवढंच काम आहे की जरांगेंना कापायचं, मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलं आहे, हे काय लोकांना कळत नाही का? असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

याचा जाब आम्ही विचारणार

ज्यांच्या घरात घुसून घुसून मारलं त्यांचं काय करायचं? ज्यांची नावं पोलीस स्टेशनमध्ये रजिस्ट्रेशन करून ठेवले त्यांचं काय करायचं? लढाई लढणारे लोक आहेत, तुम्ही नका काळजी करू कोणाची? नावं होती आणि कोणाची नव्हती? वाकोडेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण ?, परभणीमध्ये घरात घुसून मारले, बायकांना मारले याला जवाबदार कोण? आम्ही काय पॉझिटिव्ह पण घेत नाही आणि निगेटिव्ह पण घेत नाही, मला माहित नाही हे कधीपासून फडणवीस साहेबांचे प्रवक्ते पण झालेत ते.. सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा व्हिडिओ बघा, सूर्यवंशीच्या आईला ही व्यक्ती काय बोलली आहे की फडणवीस साहेब खोटं बोलत आहेत?  सूर्यवंशीचा खून झाला आणि त्याची हत्या लपवण्याचं काम सरकार करत आहे. याचा जाब आम्ही विचारणार तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला असेही आव्हाड यांनी सुनावले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे OSD जाहीर माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे OSD जाहीर
महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबतचा शासनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एकूण सात मंत्र्यांचे...
बिग बी प्रेमानंद महाराजांच्या दरबारात; म्हणाले मेरा जीवन सार्थक हो गया, सोशल मीडियात तुफान चर्चा, Video पाहाच
लहान मुलांमध्ये स्टॉमिना वाढवण्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचा डाएटमध्ये करा समावेश
लहान मुलांना सर्दी खोकल्यासाठी अँटीबायोटिक दिले पाहिजेत का? एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
राज्यात सात अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा यादी
सॅमसंगचे दोन नवीन स्मार्टफोन ‘या’ लॉन्च, मिळणार ८ जीबी रॅम मिळेल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान