मुंबई ते पुणे जाणाऱ्यांसाठी अलर्ट, रस्ता 6 महिन्यांसाठी बंद, मग कोणता पर्यायी मार्ग?

मुंबई ते पुणे जाणाऱ्यांसाठी अलर्ट, रस्ता 6 महिन्यांसाठी बंद, मग कोणता पर्यायी मार्ग?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ने जात असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. या महामार्गावर रोजचे येणे-जाणे असेल तर मग ही बातमी वाचाच. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आगामी 6 महिन्यांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. हा महामार्ग जड, अवजड, प्रवासी वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. अर्थात हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार नाही. तर त्याचा एक भाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामुळे वाहतूक कोंडीची भीती आहे. वेळेत मुंबईत पोहचण्यासाठी तुम्हाला पर्यायी मार्ग माहिती असणे आवश्यक आहे.

का बंद होत आहे हा महामार्ग?

Hindustan Times च्या वृत्तानुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर एक नवीन उड्डापुल आणि एक भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. त्यामुळे त्यातील एक भाग पुढील 6 महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRDC) कळंबोली सर्कल येथे नवीन फ्लाईओव्हर आणि अंडरपास तयार करण्यात येणार आहे. या नवीन योजनेमुळे कळंबोली येथील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होईल. वाहतूक अडथळा दूर होईल.

केव्हा बंद होईल मुंबई-पुणे एक्सप्रेसवे?

Free Press Journal च्या वृत्तानुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा एक भाग हा आजपासून 11 फेब्रुवारीपासून पुढील जवळपास 6 महिने बंद असेल. अर्थात हा एक्सप्रेसवे हा पूर्णपणे बंद करण्यात येणार नाही. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा पनवेल येथे मुंबईकडे जाणाराच रस्ता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मग पर्यायी मार्ग कोणता?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ने जाणारी पनवेल, गोवा आणि जवाहर लाल नेहरु पोर्ट ट्रस्ट कडून जाणारी सर्व वाहनं ही कोनफाटा ते NH48 कडून जातील. ही सर्व वाहनं पुढे पलास्पे सर्कल येथून त्यांच्या गंतव्य स्थानाकडे जातील.

पुणे ते मुंबई आणि तळोजा, शिळफाटा, कल्याणकडे जाणारी सर्व वाहनं ही पनवेल-सायन हायवेवर 1.2 किमी सरळ जाऊन पुरुषोत्तम पेट्रोल पंप उड्डाणपुलाच्या खालून रोडपली आणि NH48 ने पुढे जातील.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा देशातील पहिला 6 मार्गिकेचा महामार्ग आहे. तो जवळपास 94.5 किमी लांब आहे. मुंबई-पुणेमधील दळणवळणाचा कालावधी या महामार्गाने जवळपास 2 ते 2.5 तासाने कमी झाला आहे. 2002 मध्ये हा एक्सप्रेसवे सर्वांसाठी खुला करण्यात आला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बरळलेल्या नीलम गोऱ्हे यांची रामदास आठवले यांनी उडवली खिल्ली उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बरळलेल्या नीलम गोऱ्हे यांची रामदास आठवले यांनी उडवली खिल्ली
उद्धव ठाकरे यांना एवढ्या मर्सिडीज गाड्यांची आवश्यकता आहे असे वाटत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज नीलम...
Pune News – सायबर सुरक्षेसाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार, महिलांना साक्षर करणार; परिपत्रक केले जारी
भाजप आतून बाहेरून दाखवणार माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शीशमहाल, केजरीवाल यांची अडचण वाढण्याची शक्यता
आसाम निवडणुकीसाठी काँग्रेस ॲक्शन मोडवर, भाजपच्या पराभवासाठी काय आहे रणनीती? वाचा सविस्तर…
झेलेन्स्की रशियाशी चर्चेसाठी तयार, मात्र पुतिन यांच्यासमोर ठेवली ‘ही’ अट
‘आम्ही सगळे मिठाई देऊन थकलो तुमच्यापासून…’; रामदास कदमांचा राऊतांना खोचक टोला
तटरक्षक दलात 300 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख