राजकारण एका बाजूला… शरद पवार यांनी केला एकनाथ शिंदे यांचा गौरव, थेट दिल्लीतील मोठी डेव्हल्पमेंट काय?
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ‘महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार सोहळा आज पार पडत आहे. दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महादजी शिंदे यांच्या स्मृतीला वंदन करतो. या सन्मानापेक्षा येणारी जबाबदारी मोठी आहे'
यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. या पुरस्काराचं स्वरुप पाच लाख रुपये होतं, मात्र आता त्यात शिंदे यांनी आणखी पाच लाख रुपये घालून ही रक्कम 10 लाख रुपये करण्याचं जाहीर केलं आहे.
मला पुरस्कार देणारे जरी शरद पवार असले तरी ते देशाचे क्रिकेटपटू शिंदे यांचे जावई आहेत, कधी-कधी ते बाजूला बसलेल्या लोकांना गुगली टाकतात. पण माझ्यावर आजपर्यंत शरद पवार यांनी कधी गुगली टाकली नाही,टाकणार नाही अस वाटत, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List