प्रिती झिंटाने माझा संसार उद्ध्वस्त केलाय, कधीच तिला…, संसार मोडल्यानंतर अभिनेत्रीची तळमळ
बॉलिवूडमध्ये सर्वात सामान्य असणार गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर… ज्यामुळे अनेक सेलिब्रिटी महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि त्या महिलांनी बॉलिवूड अभिनेत्रींनी जबाबदार ठरवलं. असंच काही सुचित्रा कृष्णमुर्ती हिच्यासोबत देखील झालं आहे. सुचित्रा हिने अभिनेता शेखर कपूर यांच्यासोबत लग्न केलं. शेखर कपूर हे सुचित्रा हिच्यापेक्षा 30 वर्ष मोठे होते. दोघांनी लग्न तर केलं, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
धक्कादायक गोष्ट म्हणजे शेखर कपूर यांच्यासोबत झालेल्या घटस्फोटाला सुचित्रा हिने अभिनेत्री प्रिती झिंटा जबाबदार असल्याचं सांगितलं होतं. एका मुलाखतीत सुचित्रा हिने प्रिती हिच्याबद्दल हैराण करणारं वक्तव्य केलं होतं. ‘प्रिता झिंटा म्हणजे पुरुषांना गिळणारी महिला…’ असं सुचित्रा म्हणाली होती.
सांगायचं झालं तर, 2002 मध्ये सुचित्रा आणि प्रिती यांच्यात अनेक वाद झाले होते. दोघींनी एकमेंकींवर आरोप केले. प्रिती ही पुरुषांनी गिळणारी आहे… असं सुचित्रा म्हणाली होती, तर सुचित्राचं मानसिक संतूलन बिघडलं आहे… असे आरोप प्रितीने केले होते. तिला आता डॉक्टरांची गरज आहे… असं देखील प्रिती म्हणाली होती.
सुचित्रा म्हणाली होती, ‘हे एक मुक्त जग आहे आणि तिला (प्रिती) जे हवं ते ती करु शकते. खोटं वाऱ्यासारखं पसरतं. पण सत्यात खरी ताकद असते… मी तिला कधीच माफ करणार नाही… प्रितीमुळेच माझा आणि शेखरचा घटस्फोट झाला आहे..’ दरम्यान, सुचित्रा हिने केलेल्या आरोपांवर प्रितीने देखील स्पष्टीकरण दिलं होतं. माझा दोघांशी काहीही संबंध नाही… असं प्रिती म्हणाली होती.
सुचित्राचं धक्कादायक वक्तव्य
सुचित्रा एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘एक वर्षातच मला घटस्फोट हवा होता.’ कारण तिला स्कॉलरशिप मिळाली होती. तेव्हाच सुचित्राला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल कळलं. त्यामुळे तिने दोन वर्ष आणखी प्रतिक्षा केली. सुचित्राने शेखरवर आरोप लावले होते की, अभिनेता सुचित्राला सिनेमांमध्ये काम करु देत नव्हता… सुचित्र सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List