‘तेव्हा उघड्यावर कपडे बदलत होते अन्…’, तो किस्सा सांगताना मंदाकिनीच्या डोळ्यात अश्रू, म्हणाली गप्प बसण्याशिवाय पर्यायच नव्हता
80-90 च्या दशकातील ब्युटीफूल अभिनेत्री मंदाकिनी सध्या जरी चित्रपटांपासून दूर असली तर एक काळ असा होता की, तिच्यासोबत काम करण्यासाठी निर्मात्यांची लाईन लागायची. 80 च्या दशकात रिलीज झालेला ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट सुपरहीट ठरला आणि मंदाकिनीचं आयुष्य एका रात्रीत बदलून गेलं. राज कपूरने हा चित्रपट आपला मुलगा राजीव कपूरसाठी बनलवला होता. मात्र मंदाकिनीच या चित्रपटात भाव खाऊन गेली. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रत्येक अभिनेत्याची अशी इच्छा असायची की आपण एक तरी चित्रपट मंदाकिनीसोबत केला पाहिजे. निर्मात्यांची तर तिच्याकडे रांग लागली होती. मात्र त्या काळात अभिनेत्रींना आता जशा सुविधा मिळतात तशा मिळत नव्हत्या.यावर बोलताना मंदानिकीला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
नेमकं काय घडलं होतं मंदाकिनीसोबत?
अभिनेत्री मंदाकिनी अलिकडेच ‘इंडियाज बेस्ट डांसर’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या शोचे होस्ट हर्ष लिंबाचिया हे आहेत. त्यांनी मलाइकाला विचारले की आजकाल जेव्हा अभिनेत्री खुलेपनानं इकडे तिकडे फिरतात तेव्हा अनेक लोकांना त्यांच्यासोबत फिरण्याची इच्छा असते. तु जेव्हा घराबाहेर पडते तर तुला काय वाटलं? त्यावर मलाइका म्हणाली की याबाबत न विचारलेलंच बरं. मात्र या प्रश्नावर मंदाकिनी स्वत:ला थांबवू शकली नाही.
ती म्हणाली की 40 वर्षांपूर्वी परिस्थिती खूप वेगळी होती. स्टूडिओमध्ये एकच रूम असायची तिथे आम्हाला कपडे चेंज करावे लागायचे, आणि जेव्हा आउटडोअर चित्रिकरण असायचं तेव्हा तर विचारायलाच नको. उघड्यावर कपडे बदलण्याची वेळ यायची जिथे आमचं चित्रिकरण सुरू आहे, तेथील एखाद्या स्थानिकाला विनंती करून त्याच्या रूमध्ये कपडे बदलावे लागायचे. जर कधी काहीच मिळाले नाहीतर चौघीजणी पडद्याचा आडोसा करून उभ्या राहिच्या आणि मग तिथे कपडे बदलावे लागायचे. या सर्व गोष्टींचा खूप राग यायचा. पण त्यानंतर मी विचार करायचे की सर्वांनाच असं करावं लागतं, त्याला पर्याय नाही असं मंदाकिनीने यावेळी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List