Mumbai Fire – ओशिवरात फर्निचर मार्केटमध्ये अग्नीतांडव, अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
जोगेश्वरी पश्चिमेतील ओशिवरा येथे फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. लेवल 2 ची ही आग असून अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
ओशिवरा येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील फर्निचर मार्केटमधील गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळते. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल, पोलीस यांच्या आपत्कालीन पथक घटनास्थळी रवाना झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List