महाकुंभातील व्हीआयपी कल्चरचा फटका सामान्य भाविकांना बसलाय, संजय राऊत यांनी सरकारला फटकारले

महाकुंभातील व्हीआयपी कल्चरचा फटका सामान्य भाविकांना बसलाय, संजय राऊत यांनी सरकारला फटकारले

महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. गंगास्नानसाठी गर्दी झाल्याने प्रयागराजमध्ये येणाऱ्या बॉर्डर पोलिसांनी सील केल्या. त्यामुळे रस्त्यांवर वाहांनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक तासांपासून भाविक अन्न पाण्याशिवाय रस्त्यावर ताटकळत आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला व उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला फटकारले आहे.

”महाकुंभाच्या ठिकाणी विमान कंपन्या, पाणीवाले, हॉटेलवाले, गाडीवाले सर्वच भाविकांना लुटत आहेत. 15 15 तास भाविक रस्त्यावर आहेत. त्याला मी रोड अरेस्ट म्हणतो. सरकारने हात वर केलेयत. तुम्ही जगभरातील हिंदूंना कुंभमध्ये सामिल व्हायचे आमंत्रण दिले आहे. आपण यजनान आहात व यजमानांनी पाहुण्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. कुंभ हा राजकीय सोहळा झालाय, कुंभच्ं पावित्र भाजपने नष्ट केलं. काल देशाच्या राष्ट्रपती महाकुंभला गेल्या त्यावेळी 12 तास लोकांना वेठीस धरलं. राष्ट्रपतींच्या स्नानासाठी लोकांना बारा तास तिथे येऊ दिलं नाही. बोटी येऊ दिल्या नाही. त्रिवेणी संगमावर सगळं बंद केलं होतं. आंघोळीला काय बारा तास लागतात. हे जे व्हिआयपी कल्चर कुंभमध्ये आले आहे त्याचा किती फटका सामान्य भाविकांना बसलाय. राष्ट्रपतींसाठी अख्ख प्रयागराज बंद केलं, घाट बंद केलं, बोटी बंद केल्या. हा काय कुंभमेळा आहे.? अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे OSD जाहीर माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे OSD जाहीर
महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबतचा शासनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एकूण सात मंत्र्यांचे...
बिग बी प्रेमानंद महाराजांच्या दरबारात; म्हणाले मेरा जीवन सार्थक हो गया, सोशल मीडियात तुफान चर्चा, Video पाहाच
लहान मुलांमध्ये स्टॉमिना वाढवण्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचा डाएटमध्ये करा समावेश
लहान मुलांना सर्दी खोकल्यासाठी अँटीबायोटिक दिले पाहिजेत का? एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
राज्यात सात अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा यादी
सॅमसंगचे दोन नवीन स्मार्टफोन ‘या’ लॉन्च, मिळणार ८ जीबी रॅम मिळेल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान