गंभीर चाकूहल्ल्यानंतर इतका फिट कसा? लोकांच्या टीकेवर अखेर सैफने सोडलं मौन
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांच्या आयुष्यात 16 जानेवरी रोजी अशी धक्कादायक घटना घडली, ज्याचा कधी कोणी विचार देखील केला नसेल. सैफ – करीना यांच्या घरात एक हल्लेखोर घुसतो… मुलगा जेह अली खानच्या बेडकडे जाण्याचा प्रयत्न करतो… त्यानंतर हल्लेखोर सैफवर प्राणघातक हल्ला करतो. हल्ल्यात रक्त बंबाळ सैफला तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अभिनेत्याच्या मनक्यात चाकूचा टोक घुसल्यामुळे सैफची शस्त्रक्रिया करावी लागली. उपचारानंतर सैफ अली खान याला 21 जानेवारी रोजी रुग्णालयातून डिस्टार्च मिळाला. सैफ रुग्णालयातून बाहेर आल्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
सैफ याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला. पण अनेकांनी मात्र टीका केली. प्राणघातक हल्ला झाल्यानंतर सैफ अली खान पाच दिवसांत फिट झालाच कसा? अशा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. यावर सैफ अली खान याने मैन सोडलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सैफ अली खान म्हणाला, ‘मला असं वाटतं की, या प्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर सर्वांची प्रतिक्रिया येतील. काही लोकं घडलेल्या प्रसंगाची खिल्ली उडवतील तर, काहींना विश्वास बसणार नाही. मला असं वाटतं जे काही आहे ठिक आहे… कारण जगाचे वेगवेगळे रंग आहेत. मला हे अपेक्षित आहे आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.’ असं आभिनेता म्हणाला.
सांगायचं झालं तर, सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. ठाणे येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी पोसिलांची कसून चौकशी सुरु आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा सुरु आहे.
सैफ अली खान हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. अभिनेत्री करीना कपूर हिचा देखील जबाब नोंदवण्यात आला. अभिनेत्रीने दिेलेल्या माहितीनुसार, घरात समोर दागीने ठेवले होते, पण त्याने दागीन्यांकडे पाहिलं देखील नाही. तो प्रचंड आक्रमक होता… सैफवर त्याने हल्ला केला तेव्हा आम्ही तिकडेच होतो… असं करीना म्हणाली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List