आमिर खानकडे अनेक महागड्या गाड्या, तरीही मुलगा रिक्षाने का करतो प्रवास? मोठं कारण समोर
Aamir Khan Son Junaid Khan: अभिनेता आमिर खान याचा मुलगा जुनैद खान सध्या ‘लव्हयापा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात जुनैद याच्यासोबत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे. सध्या जुनैद आणि खुशी सिनेमाच्या प्रमेशनमध्ये व्यस्त आहेत. नुकताच खुशी आणि जुनैद कोरियोग्राफर-डायरेक्टर फराह खान हिच्या यूट्यूट्यूब चॅनलवर दिसले. तेव्हाच जुनैद याने रिक्षातून प्रवास बॅगेत काय काय ठेवतो… याबद्दल सांगितलं आहे.
फराह खान हिने विनोदी अंदाजात जुनैद खान आणि खुशी कपूर यांना विचारलं की तू बॅगेत काय काय ठेवलं आहेस. यावर खुशीने जुनैदच्या बॅगेतून पेन काढला. जो पेन जुनैद याने जापान येथील सेव्हन इलेवन स्टोरमधून खरेदी केलेला. त्यानंतर खुशीने जुनैदच्या बॅगमधून हेयर ड्रायर काढला. यावर जुनैद म्हणाला, ‘मी स्वतः माझे केस सेट करतो, त्यामुळे मला कधी कधी त्याची गरज भासते…’
रिक्षासाठी ठेवतो सुटे पैसे
जुनैदच्या बॅगमध्ये टॉयटेरी बॅग देखील असते, ज्यामध्ये रेझर, हेयरवॅक्स आणि पाकीट ठेवलं होतं. जुनैदच्या बॅगेतील सामान पाहून फराह चकीत होते आणि म्हणते, ‘वडील असतान पकीटात पैसे ठवतो?’ यावर जुनैद म्हणाला, ‘रिक्षासाठी मी कायम सुटे पैसे ठवतो. कारण रिक्षावाले क्रेडिट कार्ड ठेवत नाहीत…’
जुनैद का करतो रिक्षाने प्रवास?
यावर जुनैद म्हणाला, ‘रिक्षाने प्रवास करणं फार सोयीस्कर आहे. गरज भासल्यास मी घरातील गाड्यांचा देखील वापर करु शकतो…’ पुढे खुशी म्हणते, ‘यही होता है असली मिडिल क्लास हीरो हमारा….’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जुनैद खान आणि खुशी कपूर यांची चर्चा रंगली आहे.
जुनैद खान आणि खुशी कपूर यांच्या ‘लव्हयापा’ सिनेमात ग्रुशा कपूर, आशुतोष राणा, तनविका पारलीकर, देवीशी मदान, आदित्य कुलश्रेष्ठ, निखिल मेहता, जेसन थाम, यूनुस खान, युक्तम खोसला आणि कुंज यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सिनेमा 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List