शिवसैनिकांकडून वाढदिवसांची भाईंना अनोखी भेट; सांगलीत उभारला जाणार एकनाथ शिंदेंचा पहिला भव्य पुतळा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून त्यांना अनोखी भेट दिली जाणार आहे. सांगलीमध्ये एकनाथ शिंदे यांचा भव्य असा पुतळा उभारण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांचा हा राज्यातील पहिला पुतळा असणार आहे, एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये शिंदे यांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्धार शिवैसनिकांकडून करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी ही घोषणा केली आहे.
आपल्या नेत्यांचे पुतळे हे त्यांच्या निधनानंतर उभारले जातात, मात्र त्यांच्या हयातीत पुतळे उभारले पाहिजेत. म्हणून सांगलीमध्ये एकनाथ शिंदे यांचा भव्य असा पुतळा उभारला जाणार आहे, असं महेंद्र चंडाळे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या पुढच्या वाढदिवसापर्यंत सांगलीमध्ये हा भव्य असा पुतळा उभारला जाईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List