कलेचा जबरदस्त आविष्कार; रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड अँड क्राफ्टच्या दिमाखदार प्रदर्शनाला सुरुवात
रचना संसद कॉलेज ऑफ अप्लाइड अँड क्राफ्ट महाविद्यालयात 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2025 या पाच दिवसाच्या कालावधित विद्यार्थ्यांच्या कलेचे दिमाखदार वार्षिक प्रदर्शन होणार आहे. मात्र यंदाच्या सोहळ्याला एक वेगळीच चमक आहे. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. आदिती झा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोहळा रंगणार आहे.
मुंबई युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, उपकुलगुरू डॉ.अजय भामरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा दि. 21फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9:45 मिनिटांनी पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील भविष्यातील संधी आणि आव्हानं या दृष्टीने मार्गदर्शन देखील केलं.
विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेली मेहनत व त्यांना लाभलेला प्राध्यापकांचा परिस स्पर्श ह्यामुळे हे वार्षिक प्रदर्शन खूपच रंगादार व
कल्पक भासत आहे. वेग वेगळ्या वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट व कामे लोकांच्या आकर्षणाचे केंद्राबिंदू ठरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना आणखी चांगले काम करण्याचा उत्साह मिळावा याकरिता लोकांनी या प्रदर्शनाला भेट द्यायला हवी, असं मत डॉ. आदिती झा यांनी व्यक्त केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List