75 मुलींशी अफेअर्स, प्रेग्नंट गर्लफ्रेंड सोबत घाईत लग्न, कोण आहे हा अभिनेता?

75 मुलींशी अफेअर्स, प्रेग्नंट गर्लफ्रेंड सोबत घाईत लग्न, कोण आहे हा अभिनेता?

बॉलिवूडमधील घटस्फोट, अफेअर्स, एक्स्ट्रा मॅरिटीअल अफेअर या चर्चा काही नवीन नाही. अनेक सेलिब्रिटींबद्दल ईतक्या धक्कादायक सत्य असतात की विश्वास ठेवणं कठीण होतं.असाच एक अभिनेता ज्याच्या चित्रपटांपेक्षा त्याचं खासगी आयुष्यच फार चर्चेत राहीलं. त्याचे लग्नाआधी चक्क 75 गर्लफ्रेंडस होत्या. बर यातील काही गर्लफ्रेंड या चक्क त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या होत्या.

मिस इंडिया राहिलेल्या अभिनेत्रीशी लग्न

एवढंच नाही तर एक मिस इंडिया राहिलेल्या अभिनेत्रीलाही त्याने डेट केलं. ही अभिनेत्री प्रेग्नंट राहिली. मग त्याच्याबाबतीत प्रचंड चर्चा नंतर बॉलिवूडमध्ये झाल्या. हा बॉलिवूड अभिनेता आहे अंगद बेदी. अंगदने 6 फेब्रुवारी रोजी त्याचा 42 वा वाढदिवस साजरा केला.

क्रिकेटर ते अभिनेता

दिल्लीमध्ये जन्मलेला अंगद हा माजी भारतीय क्रिकेट कर्णधार बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे, अंगद अंडर-19 क्रिकेट देखील खेळला आहे.मात्र, नंतर त्याने मॉडेलिंगमध्ये करिअर सुरू केलं आणि तो अभिनय क्षेत्राकडे वळला.

अंगद बेदीने आपल्या करिअरची सुरुवात ‘काया तरण’ या चित्रपटातून केली, ज्याचे दिग्दर्शन शशि कुमार यांनी केले होते. यानंतर तो एन.एस. माधवन यांच्या मल्याळम चित्रपट ‘वानमारंगल वीझुंपोल’ (व्हेन द बिग ट्रीज फॉल) मध्ये झळकला.या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर त्याने ‘फालतू’, ‘पिंक’, ‘डियर जिंदगी’, ‘टायगर जिंदा है’ यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चा

अंगद बेदीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चा झाली. त्याने 10 मे 2018 ला अभिनेत्री तथा मिस इंडिया राहिलेल्या नेहा धूपियाशी लग्न केलं. दोघांनी अनेक वर्षं एकमेकांना डेट केलं आणि अखेर लग्नगाठ बांधली.

विशेष म्हणजे, नेहा ही अंगदपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं होतं. नेहा लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्याचं म्हंटल जातं.

आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे

एका मुलाखतीत अंगद बेदीने आपल्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे केले. नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये त्याने सांगितलं होतं की, लग्नाआधी त्याने तब्बल 75 मुलींना डेट केलं होतं! त्याने हेही सांगितलं की, त्याच्यासोबत असलेल्या काही मुली त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या होत्या

 

View this post on Instagram

 

A post shared by ANGAD BISHAN SINGH BEDI (@angadbedi)


युवराज सिंगचा बालपणापासूनचा मित्र

अंगद बेदीने सांगितलं की, तो खूप शिस्तप्रिय वातावरणात मोठा झाला आणि मुंबईत येईपर्यंत तो खूप लाजाळू स्वभावाचा होता. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्याच्या आयुष्यात मोठे बदल झाले. त्याला नवीन मित्र भेटले, वेगवेगळ्या लोकांशी ओळख झाली.अंगद बेदी आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग हे बालपणापासून चांगले मित्र आहेत. दोघ एकत्र क्रिकेटही खेळले आहेत. मात्र, वेळेनुसार त्यांच्या मैत्रीत बरेच बदल झाले.

अंगद बेदीचे वैयक्तिक आयुष्य कितीही चर्चेत राहीलं असलं तरी मात्र आहे. त्याने आपल्या मेहनतीने, अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ… म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली? 500 वर्षांपूर्वीचा हिंदूंचा काल्पनिक छळ… म्हणणाऱ्या अभिनेत्रीचं दुसरं ट्विट, शिवछत्रपतींबद्दल काय म्हणाली?
अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा सध्या तुफान चर्चेत आहे. चाहत्यांमध्ये आणि सोशल...
सिनेमा मराठीत का बनवला नाही? स्क्रिप्ट चांगली नाही; ‘छावा’ सिनेमावर मराठमोळ्या अभिनेत्रीची टीका
‘छावा’ सिनेमाला यश, विकी कौशल पोहोचला 300 वर्ष जुन्या शिव मंदिरात, असं केल्यानं पूर्ण होतात सर्व मनोकामना
‘तो बॅटिंग करत नव्हता तरीही…’, धनश्रीने उघड केलं युजवेंद्र चहलचं ते सीक्रेट
नगर अर्बनच्या घोटाळ्यातील आरोपी अजूनही मोकाट कसे? मुख्यमंत्र्यांनी कडक पावले उचलली पाहिजेत
अहिल्यानगरमध्ये अतिक्रमण हटाव सुरूच राहणार! दोन हजारांचा दंड करणार
वाईतील दोघांनीच दिली मुंबईतील चोरट्यांना टीप,सराफ बाजारातील चोरीचे गुढ उकलले; चौघांना अटक