जंक फूड खाताय!! जरा जपून… वाचा जंक फूडचे आरोग्यावर होणारे दुष्परीणाम

जंक फूड खाताय!! जरा जपून… वाचा जंक फूडचे आरोग्यावर होणारे दुष्परीणाम

 
आपल्यासाठी सध्याच्या घडीला पिज्जा, बर्गर तत्सम जंकफूड हाच परिपूर्ण आहार झालेला आहे. या आहारामुळे आपल्या शरीराला फायद्याऐवजी तोटाच होतो.  असे खाद्यपदार्थ आणि पेये आरोग्याला हानी पोहोचवण्यासोबतच अनेक आजारांचे कारण बनतात. म्हणून, काही खाद्यपदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. 
आजकाल दर दहा लोकांपैकी किमान दोन ते तीन जणांना पोटाच्या समस्येने त्रस्त असताना आपल्याला दिसतात. गॅसच्या समस्येने त्रस्त आहेत तर कुणी पोटदुखीच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत, तुम्ही देखील पोटाच्या समस्यांमुळे त्रस्त असाल, तर आत्ताच जंक फूड खाणे थांबवा. जंक फूड खाल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवरही खूप वाईट परीणाम होतात.
  जंक फूडमुळे आपल्या शरीरात अधिकांश प्रमाणात चरबी जमा होते. ही चरबी यकृतामध्ये जमा होण्यास सुरुवात होते त्यामुळेच फॅटी लिव्हर होते. तसेच जंक फूडमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे, यकृतातील ग्लुकोजचे फॅटमध्ये रुपांतर होते हेच फॅटी लिव्हरचे प्रमुख कारण आहे.  
पॅकेटबंद अन्नपदार्थ तर आरोग्यासाठी अतिशय वाईट आहेत. यामुळे वजन तर वाढतेच. पण इतर अनेक आजारांनाही सामोरे जावे लागते. जंक फूडमध्ये भरपूर कॅलरीज, मीठ, साखर आणि फॅट असते. जंक फूडमधील घटकांमुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, बद्धकोष्ठता आणि मधुमेह आजाराचा समावेश होतो.
समोसा, कचोरी, नूडल्स, मंचुरियन यासारख्या पदार्थांचा समावेश जंक फूडमध्ये होतो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या जीभेवर लगाम घाला आणि जंक फूड खाणे आजपासूनच टाळा. 
 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल
राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री सध्या विरोधकांच्या रडावर आले आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी...
ही दहा वेळा साड्या बदलणारी माणसं; विखे पाटलांना संजय राऊतांचा लय बेक्कार टोला
10 हजारांचा दंड ठोठावताच उदित नारायण कोर्टात हजर, पत्नी म्हणाली, मुंबईत गेल्यावर मागे लागतात गुंड
भारतात स्त्री सुरक्षा वाऱ्यावर? भूमी पेडणकर म्हणते, ‘भारतात महिला म्हणून वावरायला भीती वाटते…’
प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी ‘छावा’ने दिला सर्वांनाच झटका; शाहरुख-रणबीरही हादरले
भावाच्या लग्नात रणबीर-आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, म्हणाले,’संस्कार असावेत तर असे…’
प्रसिद्धीसाठी कॅन्सरबद्दल खोटं बोलल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला हिना खानचं उत्तर; म्हणाली..