गुंतवणूकदार खूष! शेअर बाजारात ‘मंगल’वार
सोमवारी शेअर बाजारात मोठी पडझड झाल्यानंतर मंगळवारी मात्र शेअर बाजारात ’मंगल’वार पाहायला मिळाले. सेन्सेक्स 1397 अंकांच्या उसळीसह 78,583 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 378 अंकांच्या वाढीसोबत 23,739 अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजाराला अच्छे दिन आल्याने गुंतवणूकदारांची संपत्ती अवघ्या एका दिवसात 5.7 कोटी रुपयांनी वाढली. छोटे आणि मध्यम शेअर्स असलेल्या गुंतवणूकदारांनाही मोठा फायदा झाला. बीएसई सेन्सेक्सच्या 30 पैकी 24 शेअर्सला आज फायदा झाला. यामध्ये लार्सनअँड टुब्रो, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स वाढले. तर आयटीसी हॉटेल्स, झोमॅटो, नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी, टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
ट्रम्प यांच्या निर्णयाचा फायदा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावरून येणाऱ्या सामानावर लावण्यात आलेल्या अतिरिक्त टॅरिफला 30 दिवसांसाठी पुढे ढकलले आहे. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता मिटली आहे. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकाच्या आयात सामानावर अतिरिक्त 25 टक्के डय़ुटी लावण्याचा निर्णय घेतला होता.
गुंतवणूकदारांनी कमावले 5.7 कोटी
बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 4 फेब्रुवारी रोजी वाढून 425.24 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याआधी म्हणजे सोमवारी 2 फेब्रुवारीला 419.54 लाख कोटी रुपये होते. तसेच बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज जवळपास 5.7 लाख कोटी रुपयांनी वाढले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी अवघ्या एका दिवसात 5.7 लाख कोटी रुपये कमावले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List