Miss World 2025- तेलंगणामध्ये साकारणार मिस वर्ल्ड स्पर्धा, उमटणार हिंदुस्थानी संस्कृतीच्या पाऊलखुणा
विश्वातील मानाचा समजला जाणारा मिस वर्ल्ड- 2025 चे आयोजन यंदा हिंदुस्थानमध्ये साकारणार आहे. तेलंगाना राज्याची यासाठी निवड करण्यात आलेली आहे. हा 72 वा भव्य दिव्य सोहळा 7 ते 31 मे दरम्यान रंगणार आहे. दरम्यान जगभरातील सौंदर्यवती आपापल्या देशांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तेलंगनातील विविध शहरांमध्ये ही सौंदर्य स्पर्धा रंगणार असून, भारताचा वारसा, संस्कृती आणि विविधता यांचे अनोखे दर्शन यावेळी घडणार आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि अंतिम सोहळा मोत्यांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या हैद्राबाद या शहरात होणार आहे. या सोहळ्याविषयी बोलताना मिस वर्ल्ड लिमिटेडच्या अध्यक्षा जुलिया मार्ले म्हणाल्या, मिस वर्ल्डचे आयोजन तेलंगनामध्ये होत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे. तेलंगना हे राज्य आदरातिथ्यसाठी तसेच सांस्कृतिक वारश्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. याठिकाणी या स्पर्धेचे आयोजन होत असल्यामुळे आम्ही आनंदी आहोत.
मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये यावेळी भारताचे प्रतिनिधत्व नंदिनी गुप्ता करणार आहे. नंदिनी ही भारतीय माॅडेल आणि सौंदर्य सम्राज्ञी आहे. 19 वर्षांची असताना नंदिनीने फेमिना मिस इंडिया हा किताब पटकावला होता. राजस्थानमधील नंदिनी यंदा या स्पर्धेमध्ये हिंदुस्थानच्या वतीने भाग घेणार आहे.
120 पेक्षा अधिक देशातील सौंदर्यवती या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. 71 वा मिस वर्ल्ड सौंदर्य सोहळा हा दिल्ली आणि मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. सध्याच्या घडीला तेलंगनामध्ये या स्पर्धेच्या आयोजनाची जोरदार तयारी सुरु असून, या स्पर्धेचा सोहळा 7 मे रोजी रंगणार आहे. अंतिम सोहळा हा 31 मे रोजी रंगणार असून, त्या दिवशी पुढची मिस वर्ल्ड कोण हे जाहीर होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List