भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्रातील भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे. या प्रकरणी श्वेता महाले या चिखली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार आहेत.
श्वेता महाले यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. तर महाले यांचे पती विद्याधर महाले हे प्रशासकीय खात्यात उच्चपदावर आहेत. श्वेता महाले यांना धमकीचे पत्र आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. श्वेता महाले यांना कुठल्या कारणावरून धमकी देण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List