Chhaava- विकी कौशलचा ‘छावा’ पडला ‘उरी’ वर भारी! रेकाॅर्डब्रेक घौडदौड…
‘छावा’ चित्रपटाने सध्याच्या घडीला बाॅक्स आॅफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. 14 तारखेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सातव्या दिवशीही दमदार कमाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे सुपुत्र संभाजी महाराजांच्या या जीवनपटाला देशासह विदेशातही पसंती मिळत आहे. ‘छावा’ चित्रपटाने केलेल्या ताबडतोड कमाईमुळे याआधी हिट झालेल्या अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड मोडले आहे. यावरूनच एक सिद्ध होत आहे की, चित्रपट उत्तम असला की प्रेक्षकही चित्रपट बघण्यासाठी सिनेमागृहामध्ये जातात.
विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भुमिका असलेला ‘छावा’ हा सिनेमा हाऊसफुल्ल चाललेला आहे. ‘छावा’ चित्रपटाच्या नेत्रदीपक कलेक्शनमुळे पठाण, जवान, गदर-2 या चित्रपटांच्या आठवणी आता ताज्या होऊ लागल्या आहेत. ‘छावा’ ने सातव्या दिवशी नेत्रदीपक यश मिळवत 22 कोटींची कमाई केली. याआधीच्या चित्रपटांचा सातव्या दिवशीचा गल्ला पाहता, ‘जवान’ चित्रपटाने 21.3 कोटी, दंगलने 19.89 कोटी, चेन्नई एक्सप्रेसने 19.6 कोटी आणि ‘स्त्री-2’ 19.5 कोटी कमावले होते. छावाला आता फक्त २४ कोटींची कमाई करण्याचा अवकाश आहे, म्हणजे हा ‘छावा’ उरीवर भारी पडणार हे नक्की…’छावा’ची ही तुफान फलंदाजी पाहता येत्या आठवड्यात ‘छावा’ ३०० कोटी पार करणार हा अंदाज आता वर्तविण्यात येत आहे.
‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, अवघ्या काही दिवसांमध्ये ब्लाॅकबस्टर सिनेमांचे रेकाॅर्ड छावाने मोडायला सुरुवात केली आहे. ‘छावा’ची देशभरातील घौडदोड ही अवघ्या सात दिवसांची असून, येत्या काळात हा चित्रपट कोटींची गगनभरारी घेणार यात दुमत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List