केरळमध्ये पुन्हा फटाक्यांमुळे दुर्घटना, कन्नूरमध्ये जळते फटाके गर्दीवर पडल्याने 5 जण जखमी
फुटबॉल समान्यादरम्यान फटाक्यांमुळे घडलेली अपघाताची घटना ताजी असतानाच आता केरळमध्ये दुसरी घटना घडली आहे. कन्नूरमध्ये एका मंदिरात फटाके फोडताना झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये 12 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. एका जखमीची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी मंगळुरु येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कन्नूर जिल्ह्यातील अझेकोड नीरकावू येथील मुचिरियन मंदिरात शुक्रवारी पहाटे 4 वाजता थेय्यमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फटाके फोडण्यात येत होते. यावेळी हवेत स्फोट होणारा एक फटाका गर्दीत पडला आणि फुटला. यामुळे पाच जण जखमी झाले. याप्रकरणी वलपट्टणम पोलीस अधिक तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List