दमानिया यांनी बॉम्ब टाकताच मोठ्या घडामोडींना वेग, धनंजय मुंडे थेट अजितदादांच्या भेटीला; काय घडणार?

दमानिया यांनी बॉम्ब टाकताच मोठ्या घडामोडींना वेग, धनंजय मुंडे थेट अजितदादांच्या भेटीला; काय घडणार?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा भ्रष्टाचाराचा घोटाळा उघड केला आहे. दमानिया यांनी तब्बल 800 कोटींचा घोटाळा उघड केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याच्या आरोपानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धनंजय मुंडे तात्काळ राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांचा भ्रष्टाचार उघड केला. मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी वर्षभरातच 800 कोटीचा कृषी खरेदीचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच या घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही केली. मुंडे यांचा भगवान गडानेही पाठिंबा काढून घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कॅबिनेट आधीच भेट

दमानिया यांची पत्रकार परिषद होताच धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत अंजली दमानिया यांच्या आरोपावरून चर्चा होण्याची शक्यताही आहे. त्यापूर्वीच मुंडे यांनी अजितदादांची भेट घेतल्याने या भेटीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंडे आधीच अडचणीत

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत गेल्या काही दिवसांपासून वाढच झाली आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. कराडशिवाय मुंडे यांचं पानही हलत नाही. त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा देऊन सत्तेवरून पाय उतार व्हावं. अन्यथा कराडची निष्पक्ष चौकशी होणार नाही, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. अजितदादा गटातील नेत्यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आधीच मागणी केलेली असल्याने मुंडे यांच्या अडचणी वाढलेल्या होत्या. त्यातच आता कृषी घोटाळा समोर आल्याने मुंडे यांचा पाय अधिकच खोलात गेल्याचं सांगितलं जात आहे.

म्हणून अजितदादांना भेटले

दरम्यान, आज कॅबिनेटची बैठक आहे. त्यामुळे मुंडे मंत्रालयात हजर होते. अजितदादांच्या दालनात एनसीपी मंत्र्यांची प्री-कॅबिनेटची बैठक आहे. त्यासाठीच धनंजय मुंडे अजितदादांच्या दालनात गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, तरीही या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List