वाल्मिक कराडने मला चुकीचा स्पर्श केला, मारहाण केली; करुणा शर्मा यांचा खळबळजनक आरोप
बीडमधील बाप आपणच, असे सांगणाऱ्या वाल्मिक कराडचा पाय अजून खोलात गेला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तपासात, खंडणीत त्याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. तर पीक विमा घोटाळ्यापासून ते हार्वेस्टर घोटाळ्यापर्यंत त्याचा सक्रिय सहभाग दिसून आला आहे. आज करुणा शर्मा यांनी वाल्मिकवर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला असा आरोप त्यांनी माध्यमांसमोर केला. यावेळी मंत्री धनंजय मुंडे तिथे उपस्थित होते, असा दावा सुद्धा त्यांनी केला.
मी कधीच आत्महत्या केली असती
आज पोटगी संदर्भात वांद्रे कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर येत पोटगी संदर्भातील माहिती दिली. धनंजय मुंडे यांना न्यायालयाने दोन लाख रुपये पोटगी तर मुलीला 75 हजार रुपये देण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. आपण कधीच आत्महत्या केली असती. मी प्रयत्नही केला होता. पण लोकांनी मला समजावलं. मुलांकडे बघा असं सांगितलं. मुलांना अमेरिकेला पाठवलं जाईल. अजून गुंड जन्माला येतील असं मला समजावलं म्हणून मी शांत बसले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
वाल्मिक कराडने केली मारहाण
धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर वाल्मिक कराडने मला मारहाण केली. मला चुकीचा स्पर्श केला. मला मारहाण झाली. तेव्हा मी डीजी आणि फडणवीस यांना अर्ज दिला होता. मला सीसीटीव्ही फुटेज द्या असं म्हटलं होतं. पण अजून दिले नाही. तर वाल्मिक कराडविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
माझ्या गाडीत रिव्हॉल्वर टाकली होती. ती केसही मी औरंगाबाद कोर्टात जिंकले. मला तीन वर्षासाठी तुरुंगात टाकण्याचा प्लान होता. पण जनतेने माझे व्हिडीओ व्हायरल केले. मीडियाने दाखवले. त्यामुळे मी वाचले. मी धनंजय मुंडे यांची पहिली बायको आहे. मी २७ वर्ष त्यांच्याशी संसार केला आहे. मी निवडणूक आयोगात मी केस टाकली आहे. आयोगाने मुंडेंना नोटीस दिली आहे. पहिली पत्नी म्हणून माझं नाव टाकायला सांगितलं. मुलाबाळांचं नाव टाकलं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करा
यावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी केली. निवडणूक अर्जात माझ्या मुलांची नावे दिली. गुंडशाही करून त्यांनी निवडणूक जिंकली. २०० बुथ कॅप्चर केले आहे. मृतांचे मतदानही केले आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. मी ते देणार आहे, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List