घटस्फोट, दुसरं लग्न 27 वर्षांनी मोठ्या मुख्यमंत्र्यांसोबत लग्न; आज अभिनेत्री 124 कोटींची मालकीण
बॉलिवूडध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा अगदी दहा ते पंधरा वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी लग्न केलंय, तर अनेक अभिनेत्रींच्या लव्हलाइफचीही तेवढीच चर्चा होताना दिसते. बॉलिवूडमध्ये अशा घटना, प्रसंग नवीन नाहीत. पण अशी एक अभिनेत्री होती जिच्या लव्हलाइफची चर्चा सर्वाधिक झाली होती आणि आजही होते.
या अभिनेत्रीने बॉलिवूडप्रमाणेच साउथमध्येही काम केलं आहे. या अभिनेत्रीचे दोन्ही लग्न प्रचंड चर्चेत राहिले आहेत. या अभिनेत्रीने चक्क आपल्यापेक्षा 27 वर्षांना मोठ्या असणऱ्या मुख्यमंत्र्यांसोबत लग्न केलं. तेव्हापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चाही होत राहिली.
वयाच्या 14 व्या वर्षी चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री
ही अभिनेत्री आहे कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव कुट्टी राधिका म्हणजेच राधिका कुमारस्वामी. ही अभिनेत्री तिच्या लव्ह लाइफमुळे अधिक चर्चेत राहिली. राधिकाने वयाच्या 14 व्या वर्षी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. राधिकाने वयाच्या 14 व्या वर्षी ‘नीनागी’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
त्यावेळी ती 9वीत शिकत होती. 2002 मध्ये आलेल्या ‘नीला मेघा शमा’ या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली. 2003 मध्ये, ती ‘इयरकाई’ चित्रपटात दिसली होती, जिथे तिने नॅन्सीची भूमिका करून मनावर राज्य केलं.
उद्योगपती रतन कुमार यांच्या सोबत लग्न
लहान वयातच तिचं मन उद्योगपती रतन कुमार यांच्यावर जडलं. कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते म्हणून त्यांनी घरातून पळून जाऊन त्यांच्याशी मंदिरात लग्न केलं. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही.
2002 मध्ये रतन कुमार यांनी राधिकाचे वडील म्हणजेच त्यांचे सासरे देवराज यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या लग्नाबाबत वाद निर्माण झाला होता. मुलीचे करिअर बरबाद होऊ नये म्हणून त्यांनीच मुलीचे अपहरण केल्याचा आरोप केला. 2002 मध्ये रतन कुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
27 वर्षांनी मोठ्या नेत्याच्या प्रेमात
राधिका प्रकाशझोतात आली जेव्हा ती तिच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठ्या नेत्याच्या प्रेमात पडली. 2010 मध्ये, राधिकाने स्वतः खुलासा केला की तिने 2006 मध्ये एचडी कुमारस्वामी यांच्याशी लग्न केलं होतं. दोघांनीही गुपचूप, लग्न केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या वेळी एचडी कुमारस्वामी 47 वर्षांचे होते तर राधिका त्यांच्यापेक्षा 27 वर्षांनी लहान होती. तर कुमारस्वामी यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांचे पहिले लग्न 1986 मध्ये झालं होतं.
राधिकाच्या वडिलांना तिचे हे लग्नही मान्य नव्हते. मात्र राधिकाने पुन्हा कुटुंबाविरोधात पाऊल उचलले आणि ही बाब वर्षानुवर्षे लपवून ठेवली. पण जेव्हा तिच्या वडिलांना या अभिनेत्रीच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा त्यांना चांगलाच धक्का बसला.
124 कोटींची मालकीण
38 वर्षांची राधिका चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणून पूर्णपणे फ्लॉप आहे. पण तिचं नाव व्यावसायिक जगतात खूप प्रसिद्ध आहे. कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांशी लग्न केल्यानंतर ती करोडोंची मालकिन बनली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका 124 कोटींची मालकीण आहे तर तिचे पती कुमारस्वामी यांच्याकडे 44 कोटींची संपत्ती आहे. दोघांनाही एक मुलगी आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List